
आऊ! श्रद्धा कपूर आता वडिलांसोबत करणार काम
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आशिकी 2, हैदर, स्त्री आणि एबीसीडी सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका करून प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.(HAIDAR)मात्र या अभिनेत्रीला शेवटचे मोठ्या पडद्यावर पाहून बराच काळ लोटला आहे.(ashiqui 2)त्यानंतर तीला चित्रपटात काम मिळाले नाही की तीने सध्या तीच्या कामातून ब्रेक घेतला असावा याचीही चर्चा नेटकरी आणि चाहत्यांच्या डोक्यात चाललेली होती.मात्र श्रद्धाने याआधी याबाबतचे कुठलेही कारण मीडियासमोर उघड केलेले नव्हतेच.(stri)
२०१० मधे श्रद्धाने तीचे वडील शक्ती कपूरसह तीन पट्टी या चित्रपटात काम केले होते.त्यानंतर या दोघा बापलेकाची जोडी कुठल्याच चित्रपटात सोबत झळकलेली नाही.श्रद्धाचे तीच्या वडिलांसोबत अनोखे नाते आहे असे ती नेहमीच गर्वाने सांगत असते.तीचे प्रेरणास्थान तीचे वडिल असल्याचेही ती नेहमीच सांगत असते.श्रद्धा तिचे वडील शक्ती कपूर आणि त्यांच्या कामापासून खूप प्रेरित आहे.घरातला कर्ता पुरूष म्हणून आणि एक उत्तम अभिनेता म्हणूनही त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे असंही ती सांगत असते.
हेही वाचा: Rishi Kapoor: वडिलांमुळे मला, आईला वेड लागण्याची आली होती वेळ, रणबीरचा खुलासा
एका मुलाखतीत तीला बऱ्याच काळापासून तीच्या मोठ्या स्क्रिनवर न दिसण्याचे कारण विचारले असता तीने धक्कादायक खुलासा केलाय.तीला तीच्या वडिलांसोबत काम करायचे आहे असं ती म्हणाली.तीच्या वडिलांसोबत तीला कॉमेडी चित्रपटात काम करायला फार आवडेल असेही ती म्हणाली.श्रद्धा कपूर शेवटची २०२० च्या थ्रिलर फिल्म बागी 3 मध्ये दिसली होती, ज्यामध्ये टायगर श्रॉफ, रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे देखील होते. लव रंजनच्या 'अजून-टायटल' प्रोजेक्टमध्ये ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. ही अभिनेत्री लंडनमधील चालबाजमध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जो १९८९ च्या चालबाज चित्रपटाचा रिमेक आहे आणि निखिल द्विवेदीच्या ट्रायोलॉजी चित्रपटात ती एका आकार बदलणाऱ्या नागाची भूमिका साकारणार असल्याचे तीने उघड केले.
Web Title: Shraddha Kapoor Reveals Reason Of Not Working In Film Industry From Two Yearsshakti
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..