Rishi Kapoor: वडिलांमुळे मला, आईला वेड लागण्याची आली होती वेळ, रणबीरचा खुलासा

बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा शर्माजी नमकिन (Sharmaji Namkeen) हा अखेरचा चित्रपट होता.
Rishi Kapoor
Rishi Kapooresakal

Bollywood News: बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा शर्माजी नमकिन (Sharmaji Namkeen) हा अखेरचा चित्रपट होता. त्यात त्यांनी काही भागातील चित्रिकरण पूर्णही केले. मात्र नियतीनं त्यांना हिरावून घेतलं. (Bollywood Actors) त्यांच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता त्या चित्रपटातील भूमिका प्रसिद्ध अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी केली आहे. सध्या त्याचे प्रमोशन सुरु आहे. यावेळी ऋषी कपूर यांचा मुलगा प्रख्यात अभिनेता रणबीर कपूरनं ऋषीजींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यानं वडिलांविषयी अनेक धक्कादायक खुलासेही केले आहे. आपल्याला ऋषीजी एक अभिनेते म्हणून माहिती आहेत. मात्र ते त्यांच्या कौटूंबिक वातावरणात कशा प्रकारचे वर्तन करायचे हे दुसरे कुणी नाही तर त्यांच्या मुलानंच सांगितल्यानं चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

कोरोनाच्या काळात तर अनेक कलाकारांना वेगवेगळ्या मानसिक आजाराला सामोरं जावं लागलं होतं. त्यामध्ये अभिनेता ऋषी कपूर यांचेही नाव होते की काय असा प्रश्न आता रणवीरच्या प्रतिक्रियेवरुन पडल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तो आता शर्माजी नमकीनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्यानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. रणबीर म्हणतो, एक वेळ अशी होती की, बाबांना घरी काम नसलं की ते घरात बसुन सातत्यानं व्हिडिओ गेम्स आणि दुसरी कुठलीही कामं करत बसायचे. त्याला फारसा अर्थ नसायचा. मात्र ते त्यांचा वेळ जावा म्हणून करत होते. मात्र त्यातून आम्हाला फारच मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. त्याचे कारण म्हणजे ऋषीजी यांचा चिडचिडेपणा. ते सारखं चिडायचे. अशावेळी मला आणि माझी आई, बहिण रिध्दिमाला मोठा त्रास सहन करावा लागला.

Rishi Kapoor
Viral Song : 'चंद्रमुखी'च्या दिलखेचक अदा: अमृतावर कौतुकाचा वर्षाव

रणबीरनं एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऋषी कपूर यांच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टींविषयी खुलासा केला आहे. कोरोनाच्या काळात खूप बदल झाले होते. अशावेळी 24 तास घरात बसुन राहिल्यानंतर ज्या प्रकारची मानसिकत तयार झाली होती ती कमालीची चिंताजनक होती. त्याचा परिणाम घरातील सर्व व्यक्तींवर होत होता. त्यात माझ्या बाबांबद्दल सांगायचे झाल्यास ते घरात व्हिडिओ गेम्स खेळायचे. सारखं तेच तेच म्हणून आई त्यांच्यावर वैतागायची. तिनं देखील वडिलांना एवढा वेळ घरात बसलेलं कधी पाहिलं नव्हतं. आणि त्यांची प्रत्येक गोष्टीतील चिडचिड आम्हा दोघांनाही त्रस्त करणारी होती.

Rishi Kapoor
RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com