श्रद्धा कपूर साकारेल 'भारताची फुलराणी'; फर्स्ट लूक व्हायरल

Shraddha Kapoors first look goes viral in Saina Nehwal biopic
Shraddha Kapoors first look goes viral in Saina Nehwal biopic

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या बायोग्राफी सिनेमांचा ट्रेन्ड सुरु आहे. यात लवकरच आणखी एक बायोग्राफी सिनेमा सामिल होणार आहे. हा सिनेमा बॅडमिंटनपटू साइना नेहवाल यांच्या जीवनावर असेल. सिनेमात साइनाची भूमिका अभिनेत्री श्रध्दा कपूर हिने साकारली आहे. साइनाच्या भूमिकेतला फोटो श्रध्दाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.  

श्रध्दाने शेअर केलेला फोटो हा साइनाच्या भूमिकेतील तिचा फर्स्ट लूक आहे. ज्यात ती हुबेहुब साइना नेहवाल दिसत आहे. श्रध्दा बॅडमिंटन कोर्टवर उभी आहे. तिच्या हातात बॅडमिंटन असून सेट जिंकल्याच्या आनंदात ती ओरडताना दिसत आहे.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#SAINA

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on



या सिनेमाच्या नावाची घोषणा अजून करण्यात आलेली नाही. सिनेमाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करत आहे. यापुर्वी त्यांनी 'तारे जमीं पर' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. श्रध्दाने या भूमिकेसाठी खूप प्रयत्न केले आहे. श्रध्दाने रोज सकाळी लवकर उठून बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतले आहे. बॅडमिंटनचे चाळीस क्लासेस तिने केले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com