Shreyas Talpade: हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसचं दमदार कमबॅक, सई ताम्हणकरसोबतचं नवं गाणं

हृदयविकाराच्या झटक्यातून सावरत श्रेयस तळपदेचं नवीन गाणं भेटीला
shreyas talpade new song from movie sri devi prasanna dil mein baji guitar
shreyas talpade new song from movie sri devi prasanna dil mein baji guitarSAKAL

Shreyas Talpade New Song: अभिनेता श्रेयस तळपदे हा मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. श्रेयसला आपण अनेक मराठी, हिंदी मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून पाहिलंय. पुष्पा सिनेमातून श्रेयसने त्याच्या दमदार आवाजाची जादू संपूर्ण भारताला दाखवून दिली.

श्रेयसला काहीच दिवसांपुर्वी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे सर्वांना चिंता वाटली. पण आता श्रेयसचं दमदार कमबॅक झालंय. श्रेयसचं सई ताम्हणकरसोबत नवीन गाणं भेटीला आलंय.

shreyas talpade new song from movie sri devi prasanna dil mein baji guitar
Satyashodhak: अभिमानाचा क्षण! न्यूझीलंडमध्ये हॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीत 'सत्यशोधक'चा प्रिमियर

श्रेयस म्हणतोय दिल में बजी गिटार

श्रेयसचं 'दिल में बजी गिटार' हे नवीन गाणं भेटीला आलंय. आगामी श्रीदेवी प्रसन्न मराठी सिनेमातलं 'दिल में बजी गिटार' हे गाणं भेटीला आलंय. या गाण्यात सुरुवातीला सई ताम्हणकर - सिद्धार्थ चांदेकर धम्माल नाचताना दिसत आहेत.

पुढे या गाण्यात श्रेयस तळपदेची दमदार एन्ट्री होतेय. श्रेयस आणि सई एकत्र नाचताना दिसत आहेत. या दोघांसोबत सिद्धार्थ चांदेकरसुद्धा धम्माल डान्स करताना दिसतो. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसला असं डान्स करताना बघून सर्वांनाच आनंद झालाय.

श्रीदेवी प्रसन्नमधील कलाकार

टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची खुप उत्सुकता आहे.

या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ यांच्यासोबतच सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार दिसणार आहे.

या तारखेला होणार 'श्रीदेवी प्रसन्न' रिलीज

विशाल विमल मोढवे दिग्दर्शित 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमाचं नावच फिल्मी नाही तर हा सिनेमा देखील प्रेक्षकांचे तितकेच मनोरंजन करेल आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यात काही शंका नाही. 'श्रीदेवी प्रसन्न'चा ट्रेलर पाहून सर्वांना सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com