Shreyas Talpade: 'पुष्पा झुकेगा नहीं' अल्लू अर्जुनचा हा लोकप्रिय डायलॉग चित्रपटाचा भाग नव्हता, श्रेयस तळपदेने केला खुलासा

श्रेयस तळपदेने खुलासा केला की 'पुष्पा झुकेगा नही' हा 'पुष्पा: द राइज' चित्रपटातील ओरिजनल डायलॉग नव्हता तर तो बदलला होता.
shreyas talpade and allu arjun
shreyas talpade and allu arjunSakal

श्रेयस तळपदे हा बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे तसेच एक अप्रतिम डबिंग कलाकार आहे. त्याने अल्लू अर्जुनचा आवाज 'पुष्दा: द राइज'मध्ये हिंदीत डब केला, जो लोकांना खूप आवडला. या चित्रपटातील 'पुष्पा झुकेगा नही' हा डायलॉग लोकांचा आवडता आहे, मात्र आता श्रेयस तळपदेने हा डायलॉग ओरिजनल तेलगू चित्रपटात नसल्याचा खुलासा केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान श्रेयस तळपदे म्हणाला, 'पुष्पासाठी डबिंग सेशन दरम्यान आम्ही खूप सुधारणा केल्या. अल्लू अर्जुनच्या लोकप्रिय डायलॉगचा शाब्दिक अनुवाद 'पुष्पा जायेगा नहीं' होता, पण तो अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही तो 'पुष्पा झुकेगा नहीं' बनवला आणि मग तुम्हाला माहित आहे की हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला आहे.'

shreyas talpade and allu arjun
Manasi Naik: मानसी नाईक देवीच्या दर्शनाला.. अंबे मातेकडे मागितली 'ही' इच्छा..

तो पुढे म्हणाला, 'चित्रपटाचा आयकॉनिक डायलॉग 'फ्लावर नहीं, फायर है मैं' मूळ चित्रपटाचा भाग नव्हता. हिंदीत डबिंग करताना आम्ही बदल केले आणि वर्षभरानंतरही लोक हा डायलॉग बोलतात. आमचा उद्देश हा होता की शाब्दिक भाषांतराऐवजी आपण त्यात अशा प्रकारे सुधारणा केली पाहिजे की ते पात्राचे सार टिकवून ठेवेल आणि प्रेक्षकांच्या लक्षातही राहील.

shreyas talpade and allu arjun
Ram Charan Birthday: लग्नाचं निमित्त ठरलं समोसे आणि चटणी.. RRR सारखीच फिल्मी आहे राम चरणची लव्हस्टोरी

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, श्रेयस तळपदे लवकरच कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी श्रेयाल तळपदे क्रिकेटर प्रवीण तांबे बायोपिक कोण प्रवीण तांबे? दिसला होता ज्यात त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com