श्रियाची "अभी तो पार्टी शुरू हुई है' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

अभिनेता शाहरूख खानच्या "फॅन' सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने या चित्रपटात छोटासा रोल केला होता; मात्र यातील तिच्या कामाची प्रशंसा झाली होती. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकण्यासाठी सज्ज झालीय.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा आगामी चित्रपट "अभी तो पार्टी शुरू हुई है'मध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसणारेय. या चित्रपटाचं नाव ऐकल्यानंतर मजामस्तीवर आधारित असेल असं वाटत असेल ना; पण असं नाही यात पार्टीचा अर्थ राजकीय पक्ष असा करण्यात आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमाचं शूटिंग लवकरच लखनौमध्ये सुरू होणार आहे. यातील श्रियाच्या भूमिकेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेलं नाही; मात्र तिला तिच्या या नव्या पार्टीसाठी शुभेच्छा तर द्यायला हव्यातच! 

Web Title: shriya pilgaonkar in new movie abhi to party shuru hui hai