'ते मला चुडैल म्हणतात, पण..'; ट्रोलर्सना श्रुती हासनचं सडेतोड उत्तर | Shruti Haasan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shruti Haasan

'ते मला चुडैल म्हणतात, पण..'; ट्रोलर्सना श्रुती हासनचं सडेतोड उत्तर

गायनाची आवड असल्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी श्रुती हासन (Shruti Haasan) परदेशात संगीत क्षेत्रातील शिक्षण घेत होती. जवळपास १५ वर्षांपूर्वीचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट करत तेव्हाच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र श्रुतीच्या या फोटोवर अनेकांनी नकारात्मक कमेंट्स करत तिच्या लूकची खिल्ली उडवली. काहींनी तिला 'चुडैल' (चेटकीण) असंही चिडवलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रुती याविषयी व्यक्त झाली.

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "जेव्हा मी चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता, तेव्हा मी संगीतावर लक्ष केंद्रीत करत होते. काहींना मात्र ही बाब समजलीच नाही. तू वॅम्पायर, चेटकीणसारखी दिसतेय, असं ते म्हणाले. तुम्ही मला चुडैल किंवा आणखी काहीही म्हणा, मला त्या गोष्टींचा फरक पडत नाही. ते माझं खरं सौंदर्य आहे आणि त्यामुळे मला सकारात्मक एनर्जी मिळते."

हेही वाचा: विकी-कतरिनाने साजरी केली लग्नानंतरची पहिली 'लोहरी'

श्रुतीने अभिनयातून दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. ती लवकरच 'सलार' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तेलुगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे. श्रुतीने काही महिन्यांपूर्वी नवीन घर विकत घेतलं. मात्र त्यानंतर लगेच लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे घराचे हफ्ते भरण्यासाठीही तिला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं तिने सांगितलं. "या महामारीच्या काळात काही लोकांनी घर किंवा कार विकत घेतलं नाही. पण मी घर विकत घेतलं आणि सर्व समस्या सुरू झाल्या. त्यामुळे आता मला त्याचे हफ्ते भरण्यासाठी काम करावंच लागेल", असं तिने स्पष्ट केलं होतं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top