६ तास रडणं, ६ तास डान्स.. अभिनेत्री श्रुती शर्माने सांगितलं कशी करतेय शोसाठी तयारी

shruti sharma
shruti sharma

मुंबई- 'नमक इश्क का' मालिका फेम श्रुती शर्मा साकारत असलेल्या चमचम या पात्राची आणि नवीन शोच्या पात्राबाबत श्रुती शर्माने एक वेबसाईटसोबत खास बातचीत केली आहे. सोबतंच श्रुतीने या पात्रासाठी घेतलेली मेहनत अबरारसोबत पुन्हा एकदा काम करण्याबाबत देखील तिने सांगितलं आहे. 

श्रुतीने तिच्या चमचम या पात्राविषयी सांगताना म्हटलं की, 'या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि यामध्ये मेहनत आहे कारण यात अनेक डान्स सिक्वेन्स आहेत. १२ तास सतत डान्स करणं सोप काम नाही. कधी कधी असं होतं की मी ६ तास रडते आणि ६ तास डान्स करते. हे खरं तर खूप कठीण आहे मात्र मी माझे १०० टक्के देत आहे आणि खूप मेहनत करत आहे जेणेकरुन प्रेक्षकांना हा शो आवडेल. मला असं वाटतं की प्रेक्षकांना हा शो पसंत देखील पडत आहे आणि आमच्या सगळ्यांची मेहनत कामी येईल.'

श्रुतीला ख-या आयुष्यात देखील डान्स करायला आवडतो. डान्सिंग तिची आवड आहे. डान्स तिचा स्ट्रेस बस्टर असल्याचं तिने म्हटलंय. जेव्हा कधी तिचा मूड खराब असतो तेव्हा ती डान्स करते. मात्र जेव्हा तुम्ही कॅमेरासमोर असता तेव्हा डान्स करताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागतं जे सोपं नसतं.श्रुतीला याआधी 'गठबंधन' या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं होतं. याशिवाय 'नजर २' आणि 'जादू हे जिन का'मध्येही ती दिसून आली होती. यावेळी पुन्हा एकदा श्रुती आणि मोनालिसा एकत्र दिसणार आहेत मात्र आता ही जोडी सासू-सुनेची असणार आहे.   

shruti sharma namak ishq ka actress interview talks about chamcham her role  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com