Sara Ali Khan सोबतच्या डेटिंगवर शुभमन गिलनं सोडलं मौन, अफेअर विषयी हिंट देत म्हणाला....

शुभमन गिलनं प्रसिद्ध पंजाबी चॅट शो 'दिल दिया गल्ला' मध्ये सारा अली खान सोबतच्या नात्यावर खुलासा केला आहे.
Shubhman Gill Just confessed dating sara ali khan,Punjabi chat show.
Shubhman Gill Just confessed dating sara ali khan,Punjabi chat show. Google
Updated on

Sara ali Khan: बॉलीवूड दीवा सारा अली खानचे सिनेमेच नाहीत तर तिचं लव्ह लाईफही चर्चेचा विषय ठरत आहे. बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे की क्रिकेटर शुभमन गिलला ती डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. पण या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे किती खोटं? या सगळ्यावर क्रिकेटर शुभमन गिलने रिअॅक्ट केलं आहे.(Shubhman Gill Just confessed dating sara ali khan,Punjabi chat show.)

Shubhman Gill Just confessed dating sara ali khan,Punjabi chat show.
Ranveer Singh: बड्या निर्मात्याचं रणवीरसोबत लज्जास्पद कृत्य; म्हणाला, 'कुत्रा अंगावर सोडत...'

शुभमन गिल हा प्रिती आणि नीति सिमोसच्या प्रसिद्ध पंजाबी चॅट शो 'दिल दिया गल्ला' मध्ये गेला होता. हा शो सोनम बाजवा होस्ट करत आहे. शो मध्ये क्रिकेटरला विचारलं गेलं की बॉलीवूडमधली सगळ्यात फिट अभिनेत्री कोण? क्षणाचाही विलंब न करता शुभमनने साराचं नाव घेतलं. पुढचा प्रश्न होता की,'तो साराला डेट करत आहे का?' त्याचं उत्तर देताना शुभमन म्हणाला-''कदाचित...''. जेव्हा शुभमनला विचारलं गेलं की सगळं खरं खरं सांग. तेव्हा शुभमननं लाजत,चेहऱ्यावर मोठं हास्य आणत म्हटलं की,'' सारा द सारा सच बोल दिया..शायद हां,शायद नहीं''.

Shubhman Gill Just confessed dating sara ali khan,Punjabi chat show.
Aamir Khan: वयाच्या ५७ व्या वर्षीच अभिनयाला रामराम करण्याचा आमिरचा विचार पक्का; म्हणाला,'आता मी...'

आता शुभमनचे हे उत्तर ऐकून आपण स्वतःच अंदाज लावा की तो साराला डेट करत आहे की नाही. शुभमननं पूर्णतः हो जरी म्हटलं नसलं तरी त्यानं नकारही दर्शवला नाही. सारा आणि शुभमनच्या डेटिंगच्या बातम्या यावर्षी ऑगस्टपासूनच व्हायरल होऊ लागल्या होत्या. दोघांना एकत्र एका हॉटेलात देखील स्पॉट केलं गेलं होतं. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ते एके ठिकाणी एकत्र दिसले होते. दिल्लीच्या एका हॉटेलमधून बाहेर पडतानाही त्यांना पाहिलं गेलं. त्या दोघांनी सगळं लपवायचा खूप प्रयत्न केला पण त्यात अपयशी ठरले. सोशल मीडियावर त्यांची एकत्र फिरतानाची क्लीप जोरदार व्हायरल झाली.

सारा अली खानने अद्याप शुभमन सोबतच्या डेटिंगवर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. चाहते आता वाट पाहत आहेत की दोघे कधी एकदा त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करतायत. तसं पाहिलं तर सारा अली खाननं याआधी कार्तिक आर्यनला डेट केलं आहे. 'लव्ह आज कल २' सुरू होण्याआधी दौघांचे नाते सुरू झाले आणि सिनेमाचं शूट संपता संपता तुटूनही गेलं. त्याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. 'कॉफी विथ करण ७' मध्ये सारानं कार्तिकसोबत आपलं नातं तुटल्याची बातमी कन्फर्म केली होती. दोघेही आता आपल्या आयुष्यात पुढे निघून गेलेयत. कार्तिक पश्मिना रोशनला जी हृतिकची बहिण आहे तिला डेट करत असल्याचं कळत आहे. तर साराचं नाव शुभमनसोबत जोडलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com