उपचारांसाठी अमेरिकेला जाण्यात संजय दत्तला येऊ शकतात अडचणी, मुंबई स्फोटांशी संबंधित आहे प्रकरण

sanjay dutt
sanjay dutt

मुंबई- अभिनेता संजय दत्तला कॅन्सरचं निदान झाल्याची बातमी जशी समोर आली तसे त्याचे चाहते नाराज झाले. सगळीकडून आता संजय दत्त लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली जात आहे. याचदरम्यान असं म्हटलं जातंय की संजय दत्त त्याच्या कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी अमेरिकेला जाणार आहे. मात्र आता यामध्ये एक मोठी अडचण आड येणार असल्याचं दिसतंय. 

संजय दत्तला गेल्या काही दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तो लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याने कोविडची टेस्ट देखील केली होती ती निगेटीव्ह आली. त्यामुळे तो बरा होऊन घरी परतला. मात्र मंगळवारी रात्री उशीरा त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. संजय दत्तचा हा कॅन्सर तीस-या स्टेजला असल्याचं कळतंय. त्यामुळे संजू लवकरंच उपचारासाठी परदेशी जाण्याची तयारी करतोय. 

मिडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्तकडे अमेरिकेचा विजा नाहीये. तेव्हा संजय दत्त सध्या हा विजा मिळवण्याच्या तयारीला लागला आहे. संजय कदातिच अमेरिकेतील मेमोरियल स्लोआन केटरिंग कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाऊ शकतो. असं म्हटलं जातंय की संजय दत्तला अमेरिकेला जाण्यासाठी एक अडचण आड येऊ शकते. याचं कारण आणि मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरण. अभिनेता संजय दत्त मुंबई बॉम्ब स्फोट मालिकांमधील दोषी आहे तसंच तो आत्ताच त्याची शिक्षा भोगून आला आहे. तेव्हा त्याला अमेरिकेला जाण्यासाठी परवानगी न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय दत्त उपचारांसाठी सिंगापूरला जाण्याची देखील शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. 
  

will sanjay dutt not be able to go to america for treatment because the case related to mumbai blast  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com