
Actor Siddharth : 'हिंदीतून बोलले नाहीत म्हणून आई वडिलांना मिळाली अपमानास्पद वागणूक!' सिद्धार्थचा संताप
Siddharth bollywood actor alleges his parents : रंग दे बसंती फेम सिद्धार्थ हा त्याच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशावेळी त्यानं आपल्या आई वडिलांसोबत जो अपमानास्पद प्रकार घडला त्यावरुन संताप व्यक्त केला आहे.
सिद्धार्थनं सोशल मीडियावर यासंबंधीची एक पोस्ट शेयर करुन त्यानं माहिती दिली आहे. मदुराईच्या विमानतळावर घडलेल्या त्या प्रसंगानं नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. केवळ भाषेमुळे एका प्रसिद्ध कलाकाराच्या वाट्याला अशा प्रकारचा अपमान येत असेल तर सर्वसामान्यांची काय गोष्ट. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Also Read- क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Siddharth bollywood actor alleges his parents
मदुराई विमानतळावर सुरक्षारक्षकांकडून सिद्धार्थच्या आई वडिलांना मानसिक त्रास देण्यात आला. सिद्धार्थनं याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, माझ्या आई वडिलांनी सुरक्षारक्षकांशी इंग्रजीमध्ये संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना देखील इंग्रजीमध्ये बोला असे सांगितले. मात्र ते सुरक्षा कर्मचारी देखील सातत्यानं हिंदीतच बोलत होते. त्यांचे म्हणणे होते की, आई वडिलांनी हिंदीत बोलावे.
सिद्धार्थच्या इंस्टावरील त्या पोस्टनं आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिद्धार्थनं त्या पोस्टमध्ये आई वडिलांना कशाप्रकारे मानसिक त्रास दिला हे सांगितले आहे. २० मिनिटांपर्यत ते सुरक्षारक्षक माझ्या आई वडिलांशी वाद घालत होते. ते काही केल्या ऐकायला तयार नव्हते. हिंदीत नको तर इंग्रजीमध्ये संवाद साधा असे सांगितल्यानंतरही कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
हेही वाचा: Shark Tank India 2: 'लोकांनी खूप त्रास दिला, वैयक्तिक आयुष्यात केली ढवळाढवळ! तरीही...' पियुषचा मोठा निर्णय
सिद्धार्थनं त्याची पोस्ट ही सीआयएसएफ (सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स) टॅग केली आहे. त्यानं ती चुकून सीआरपीएफला टॅग केली होती. यापूर्वी सिद्धार्थ हा सायना नेहवालवर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे चर्चेत आला होता.