Sidharth-Mitali Video: नवरा बायकोसोबत सईची चिकन पार्टी! मिताली-सिद्धार्थचा अतरंगी 'कोंबडी' डान्स व्हायरल

सिद्धार्थ- मिताली अन् सईचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल!
Sidharth Chandekar Mitali Mayekar Video:
Sidharth Chandekar Mitali Mayekar Video: Esakal

Sidharth Chandekar Mitali Mayekar Video: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. सिद्धार्थ अन् मितालीने मालिका आणि चित्रपटांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघांच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. सिद्धार्थ अन् मिताली सोशल मिडियावर कायम सक्रिय असतात. त्याचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत असतात.

अशातच मिताली आणि सिद्धार्थचा आणखी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्याची साथ दिली आहे अभिनेत्री सई ताम्हणकरने. सई, मिताली आणि सिद्धार्थ यांनी कोंबडीच्या व्हिडिओसोबत रिमिक्स व्हिडिओ शेयर केला आहे.

या व्हिडिओत एकीकडे तीन कोंबड्या दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला मिताली डान्स करताना दिसते तर तिला सई आणि सिद्धार्थने साथ दिली आहे.

Sidharth Chandekar Mitali Mayekar Video:
Rashmika Mandanna: रश्मिकाच्या डिपफेक व्हिडिओप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! 4 आरोपींना घेतले ताब्यात! मुख्य आरोपी अजूनही फरार

या व्हिडिओला चिकन पार्टी असं कॅप्शन दिलं आहे. अनेक कलाकारांनी मिताली आणि सिद्धार्थच्या व्हिडिओला कमेंट केल्या आहेत. सईचा गेस्ट अॅपियन्स तर प्रिया बापटनं विचारलं , 'हे काय चाललंय तुमच' तर अनेकांनी या व्हिडिओला हसण्याचा इमोजी कमेंट केला आहे. सध्या या व्हिडिओला कोंबडी पळाली 2. 0 म्हटले जात आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Sidharth Chandekar Mitali Mayekar Video:
Salman Khan: "दूर व्हा सगळे!" भावाच्या वाढदिवसाला सलमान रागाने लालबुंद, काय झालं नेमकं? व्हिडीओ व्हायरल

आपल्या कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढत या तिघांनी हा भन्नाट व्हिडिओ तयार केला आहे. सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झालं, तर तो 24 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा 2' चित्रपट दिसला होता. आता सिद्धार्थ लवकरच नाना पाटेकर यांच्यासोबत 'ओले आले' चित्रपटात दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com