esakal | सिद्धार्थ-सखीचं ‘बेफाम’ प्रेम; युवा पिढीला आकर्षित करणारा चित्रपट
sakal

बोलून बातमी शोधा

siddharth chandekar and sakhi gokhle

२६ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘बेफाम’ चित्रपट होणार महाराष्ट्रभर प्रदर्शित

सिद्धार्थ-सखीचं ‘बेफाम’ प्रेम; युवा पिढीला आकर्षित करणारा चित्रपट

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री सखी गोखले यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना आगामी 'बेफाम' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यश आणि अपयशाचे समीकरण मांडणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर एक वेगळाच प्रवास दर्शवितो. याच्याच जोडीला प्रेमाच्या नात्याचे पदर उलगडणारे आणि प्रेमाच्या जगातील भावनांच्या हिंदोळ्यावर सफर घडविणाऱ्या प्रेमगीतांचा वर्षाव या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रोमॅंटिक गाण्यांसह चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 

या चित्रपटात सखी एका आरजेच्या भूमिकेत आहे. तर सिद्धार्थ त्याच्या करिअरची निवड करण्यात गोंधळलेला तरुण आहे. आई-वडिलांच्या इच्छेखातर क्षेत्र निवडावं की आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करावं या विवंचनेत सापडलेल्या सिद्धार्थच्या आयुष्यात पुढे काय घडतं, ते या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा : 'येऊ कशी..'मधल्या ओमकारची रिअल लाइफ गर्लफ्रेंड; पोस्ट केले रोमँटिक फोटो 

हेही वाचा : बॉडीगार्डला दीपिका मानते भाऊ; देते तब्बल इतका पगार

‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत व अमोल कागणे निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शनक कृष्णा कांबळे यांनी केलं आहे. सिद्धार्थ आणि सखीसह या चित्रपटात अभिनेते विद्याधर जोशी, शशांक शेंडे, कमलेश सावंत, महादेव अभ्यंकर, नचिकेत पर्णपुत्रे आणि अभिनेत्री सीमा देशमुख यांचं उत्तम अभिनय पाहायला मिळणार आहे. येत्या २६ फेब्रुवारी २०२१ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल.