'मला नाही येत,मला नाही जमत' सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टने खळबळ

अभिनेत्याच्या पोस्ला काही चाहत्यांनी दाद दिली आहे, तर काहींनी त्यावर काळजी व्यक्त केली आहे.
Siddharth Chandekar New Post
Siddharth Chandekar New PostGoogle
Updated on

सिद्धार्थ चांदेकर(Siddharth Chandekar) हा मराठीतला एक उत्तम नट असण्यासोबतच तो खूप हसत-खेळत वावरणारा,स्वच्छंदी स्वभावाचा माणूस आहे. अर्थात हे अनेकदा त्याच्या मुलाखती करताना मला आलेल्या अनुभवातूनच केवळ मी म्हणत नाहीय, तर मराठी इंडस्ट्रीतल्या अनेकांकडून तसं मी अनेकदा त्याच्याविषयी बोलताना ऐकलं आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो पण कधी तो काहीतरी वक्तव्य करुन वादात पडलेला किंवा मग एखादी खूपच विचार करायला लावणारी पोस्ट वगैरे करून चर्चेत आलेला मी तरी पाहिला नाही आहे. सोशल मीडियावर नेहमीच तो आपले पर्यटनाचे,ट्रॅकिंगचे,जंगल सफारीचे,बायको मिताली सोबतचे फन व्हिडीओ शेअर करताना दिसतो. पण आता मात्र सोशल मीडियावरील त्याच्या एका पोस्टने लक्ष वेधलं आहे. काय आहे ती पोस्ट? (Siddharth Chandekar New Post)

सिद्धार्थानं त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. जो एक विचार आहे. ज्यात त्यानं म्हटलं आहे,''मला नाही माहित,मला नाही येत,मला नाही जमत. हे म्हणायला किती धाडस लागतं. मी कुणीतरी आहे,हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहासात 'मी आहे' हे स्वतःला कधी सांगणार?...अशा अर्थाच्या या पोस्टला कॅप्शन देताना त्यानं लिहिलंय,''मी मीच आहे..स्फुटलेखन..'' आता त्याच्या या पोस्टचा चाहते मात्र डोक्याला ताण देऊन विचार करताना दिसत आहेत.

Siddharth Chandekar New Post
'मन उडू उडू झालं' मध्ये आता प्रेमाचा त्रिकोण; इंद्रा,दीपू आणि 'ती'?

कारण नेहमी हसत-खेळत काहीतरी धमाल पोस्ट करणाऱ्या सिद्धार्थने अचानक अशा पद्धतीची पोस्ट,किंवा त्यातला विचार स्वतःला आलेल्या अनुभवावरुन लिहिलाय की कुणालातरी खोचकपणे ऐकवण्यासाठी लिहिलाय. काही त्याच्या चाहत्यांनी,'खूप चांगला विचार' अशा प्रतिक्रिया लिहिल्या आहेत,तर काहींनी तो अचानक असा व्यक्त का झाला यामुळे त्याच्याविषयी काळजी देखीलल व्यक्त केली आहे. सिद्धार्थ सध्या छोट्या पडद्यावर एका गाण्याच्या रिअॅलिटी शो चे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काहीही असलं तरी त्याच्या पोस्टने मात्र प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं असणार हे मात्र नक्की...एक उत्तम विचार,आपल्यालाही त्यावर विचार करायला काय हरकत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com