esakal | सिद्धार्थ - मितालीची मॉडर्न लव्हस्टोरी; अशी झाली पहिली भेट
sakal

बोलून बातमी शोधा

siddharth mitali

जेव्हा सिद्धार्थने मितालीने प्रपोज केलं, तेव्हा...

सिद्धार्थ - मितालीची मॉडर्न लव्हस्टोरी; अशी झाली पहिली भेट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठीतील सर्वांत चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर. २४ जानेवारी २०२१ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानिमित सिद्धार्थ व मितालीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दोघांनी सुरुवातीला आपल्या रिलेशनशिपला सर्वांपासून लपवलं होतं. मात्र जेव्हा सिद्धार्थने मितालीने प्रपोज केलं, तेव्हा दोघांनीही सोशल मीडियावर रिलेशनशिप जाहीर केलं. या दोघांची लव्हस्टोरीसुद्धा खूप रंजक आहे. 

एका मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. या भेटीत हळूहळू मैत्रीत रुपांतर झालं. २०१७ मध्ये सिद्धार्थने मितालीच्या वाढदिवसानिमित्त एका सरप्राइज पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला मिताली व सिद्धार्थचे जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित होते. त्यांच्यासमोर सिद्धार्थने मितालीला लग्नाची अंगठी देत आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या. मितालीने होकार कळवताच दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले. 

हेही वाचा : राणासोबत पाठकबाईंचा रोमँटिक Reel व्हिडीओ; चाहत्यांनी विचारलं, 'डेट करताय का?'

हेही वाचा : "पूजा माझी मुलगी नसती तर तिच्यासोबत लग्न केलं असतं"; महेश भट्ट यांनी का केलं होतं ते विधान?

काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जवळपास दोन वर्ष हे दोघं लिव्ह इनमध्ये राहिले. २०१९ मध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. २०२० मध्येच ही जोडी लग्नबंधनात अडकणार होती. मात्र करोना महामारी व लॉकडाउनमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. सिद्धार्थ-मितालीच्या केळवणापासून, हळद, संगीत ते अगदी लग्नसोहळ्यापर्यंतचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मिताली सध्या झी मराठी वाहिनीवरील 'लाडाची मी लेक गं' या मालिकेत भूमिका साकारत आहे. तर सिद्धार्थ 'सांग तू आहेस का' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. 
 

loading image