जेव्हा सिध्दू तृप्तीला डोक्‍यावर घेतो 

टीम ई सकाळ
शनिवार, 20 मे 2017

सध्या सिध्दार्थ जाधव आणि तृप्ती जाधव यांची चर्चा आहे. या जोडीला नच बलीयेच्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. उद्या म्हणजे रविवारी या जोडीचा धमाकेदार डान्स पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. सिध्दू तृप्तीने दरवेळी आपल्या परफॉर्मन्समध्ये मराठीपण जपले आहे. उद्याही याचा प्रत्यय येणार आहे. ही जोडी अग्निपथ या सिनेमातील देवा श्रीगणेशा या गाण्यावर नाचले आहेत. पण या गाणयातला क्‍लायमॅक्‍स असा की यात शेवटी सिद्धार्थने तृप्तीला चक्क डोक्‍यावर घेतले आहे. खुद्द सिध्दार्थने ही माहीती ई सकाळला दिली. हा थरारक अनुभव घेण्यासाठी मात्र रविवारचा हा एपिसोड पाहावा लागेल. 

मराठी जनांना अभिमानच बाटेल 
ई सकाळशी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, आम्ही एलिमिनेट झालो त्यावेळी आमच्या परफॉर्मन्सला 30 पैकी 30 गुण मिळाले होते. तरीही आम्हाला बाहेर पडावे लागले. कारण आम्हाला खूप कमी व्होट मिळाले. तेव्हा आमच्या लक्षात आले की दर्शकांनी व्होट करणेही तितकेच गरजेचे आहे. व्होट करण्यासाठी फक्‍त मिस कॉल द्यायचा आहे. आम्ही आमच्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये आमचं मराठीपण जपले आहे. म्हणूनच आम्ही आमचा पहिला परफॉर्मन्स झिंगाटवर केला. आमचे पुढचे सगळे नाच हे मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असेच असतील. 

ऑफ द रेकॉर्ड सूचना.. 
तृप्ती आणि सिद्धार्थ यांचा डान्स परफॉर्मन्स नच बलियेच्या सर्व टीमला खूप आवडतोय. पण त्याला फार व्होटिंग नसल्यामुळे या जोडीला बाहेर पडावे लागले. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाल्यावर एकीकडे आनंदी आनंद झालाच. त्याचवेळी आता तुम्ही व्होटींगवर लक्ष द्या अशी प्रेमळ सूचना या दोधांना करण्यात आली आहे. कारण हा शो फक्त परिक्षकांच्या गुणांवर नसून प्रेक्षकांच्या व्होटिंगवरही अवलंबून आहे. तो भाग सांभाळा असे सांगण्यात आले आहे, अशी माहीती नच बलीयेच्या सेटवरून मिळते. 

तो थरारक क्षण.. 
रविवारी होणाऱ्या सादरीकरणात सिद्धूने गाण्याच्या शेवटी तृप्तीला खांद्यावर उचलून घेत वॉक केला आहे. ही मूव्ह सगळ्यात अवघड होती. देबा श्रीगणेशा या गाण्यावरचा या जोडीचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडलाच. पण सरते शेवटी हा क्षण आल्यानंतर मात्र सर्वानीच टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. ही स्पर्धा फक्त नाचाची नाही. इथे तुम्हाला ऍक्‍ट करावा लागतो. समोरच्याला उचलावे लागते.याला टायमिंग आणि कसब लागते. समतोल राखत तृप्तीला उचलणे आव्हान होते. पण तिची साथ आणि अचूक टायमिंग यामुळे हे शक्‍य झाले, असेही सिद्धू म्हणाला. 

Web Title: Siddharth Jadhav and wife are back!