Aamir Khan: दोन घटस्फोट झाल्यानंतर आमिर म्हणतोय, 'चुका केल्या, आता...' Koffee With Karan 7 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koffee With Karan 7: Aamir Khan says, not spent time with family, kids

Aamir Khan: दोन घटस्फोट झाल्यानंतर आमिर म्हणतोय, 'चुका केल्या, आता...'

Aamir Khan: बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानचा लाल सिंग चड्ढा(Laal Singh Chaddha) येत्या ११ ऑगस्टला रिलीज होत आहे. नुकताच आमिर या सिनेमाच्या प्रमोशनसाठी करिना कपूरसोबत 'कॉफी विथ करण ७' या चॅट शो मध्ये सामिल झाला होता. या शो मध्ये येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटींचे सीक्रेट्स जगासमोर खुले होतात. अर्थात हाच तर या शो चा यूएसपी म्हणावा लागेल. सेलिब्रटींविषयीच्या नवनवीन गोष्टी या शो मधनं कळतात. हॉटस्टारवर हा शो आज म्हणजे गुरुवारी ४ ऑगस्ट रोजी स्ट्रीम केला जाणार आहे. यामुळे आमिर-करिनाविषयीचे अनेक सीक्रेट्स आता त्यांच्या चाहत्यांसमोर येणार आहेत.(Koffee With Karan 7: Aamir Khan says, not spent time with family, kids)

आमिरने या शो मध्ये सांगितले आहे की, कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु झालं, काम बंद झालं आणि त्याच दरम्यान आपल्याला स्वत्ःचं आत्मपरिक्षण करण्यास खूप वेळ मिळाल्याचं तो म्हणाला. अभिनेत्यानं तेव्हा आपण प्रत्येक नात्यात कसे अयशस्वी ठरलो,आपलं कसं चुकलं याचा खुलासा केला आहे. आपण आपल्या कोणत्याच नात्याला फार वेळ दिला नाही. तो म्हणाला,एक वर्ष आधी मी स्वतःचं आत्मपरिक्षण केलं. आणि मला जाणवलं की,जसं मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं तसं माझ्या नात्यांच्या बाबतीत केलंच नाही. मला आता कळतंय की लहानपणी माझ्या मुलांना इरा आणि जुनैदला मी वेळद दिला नाही.

तो पुढे म्हणाला,''काही महिन्यांपासून मला स्वतःमध्ये खूप बदल जाणवतोय. माझं कुटुंब, माझी मुलं, किरणचे आई-वडील, रीनाचे आई-वडील, माझी आई,बहिण आणि भाऊ या सगळ्यांसोबत मी आता जास्त कनेक्ट झालोय. मी या सगळ्यांसोबत जास्तीत-जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय. मग भले मला यामुळे माझ्या कामाशी तडजोड करावी लागली तरी चालेल. अर्थात आता मी माझ्या कामाशी देखील तेवढाच जोडलेलो आहे''.

आमिर खान हे देखील म्हणाला की, तो आता आपल्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी रिना आणि किरण यांच्याशी संवाद साधतो, आठवड्यातून एकदा मुलांना भेटतो. त्यानं हे देखील म्हटलं की माझ्या मनात रीना आणि किरण या दोंघींप्रती सम्मान आहे. आमिर आणि रीनाचं लग्न १९८६ साली झालं होतं. इरा आणि जुनैद ही आमिर आणि रीनाचीच मुलं. २००२ मध्ये आमिरचा रीनासोबत घटस्फोट झाला. आणि २००५ मध्ये आमिरने किरण रावसोबत लग्न केलं होतं. २०११ मध्ये दोघांना आझाद हा मुलगा सरोगसीच्या माध्यमातून झाला. आणि २०२१ मध्ये आमिरने किरणपासून आपण विभक्त होत असल्याची घोषणा केली.