सिद्धार्थ जाधवचा घटस्फोट? पत्नीनं सोशल मीडियावरुन 'जाधव' आडनाव हटवलं.. | Siddharth Jadhav Divorce Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddharth Jadhav Divorce Updates

सिद्धार्थ जाधवचा घटस्फोट? पत्नीनं सोशल मीडियावरुन 'जाधव' आडनाव हटवलं..

Siddharth Jadhav : सेलिब्रिटींचे अफेअर्स,विवाह सोहळे जेवढे गाजतात,किंबहुना त्याहून अधिक गाजतात त्यांचे घटस्फोट(Divorce). सिनेइंडस्ट्रीत तर असे घटस्फोट समोर आले आहेत की त्यामुळे चाहत्यांना अनेकदा धक्का बसला आहे. 'कालपरवा पर्यंत यांच्यात सगळं गोड होतं मग आता असं अचानक झालं तरी काय?' असा प्रश्न एका सामान्य चाहत्याला सतावू लागतो. नेहमीच बॉलीवूडमध्ये घटस्फोट जास्त होतात असं आपण म्हणत आलोय पण आता तिथलं वारं मराठी इंडस्ट्रीलाही लागल्याच चित्र आहे. गेली काही दिवस आपल्या सर्वांचा मराठीतला लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav) याच्या वैवाहिक आयुष्यात(Married Life) काहीतरी बिनसलंय अशी चर्चा होती. पण आता त्याची खात्री देणारी बाब समोर आली आहे. (Siddharth Jadhav Divorce Updatese)

हेही वाचा: राजकीय गदारोळात आरोह वेलणकरची उडी, एकनाथ शिंदेंना टोला.. म्हणाला..

सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती (trupti jadhav) यांनी निभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. कारण सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती जाधव काढून तृप्ती अक्कलवार (trupti akkalwar) असं केलं आहे. तिनं नावामधील जाधव हे अडनाव हटवल्यानं सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ हा आपल्या दोन मुलींसोबत ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थनं केवळ मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते. यावेळी पत्नी तृप्ती तिथे का नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आणि तिथूनच या चर्चाना सुरुवात झाली.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहत नाहीत. पण याबाबत कोणीतही अधिकृत माहिती सिद्धार्थ आणि तृप्तीनं दिलेली नाही. सिद्धार्थ आणि तृप्तीनं 2007 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्तीनं झलक दिखला जा या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमधील तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सिद्धार्थ कायमच आपल्यान पत्नीबद्दल भरभरून बोलत आला आहे. त्याच्या प्रेमाविषयी सांगत आला आहे. पण अचानक असे का झाले याचीच खंत चाहत्यांना लागली आहे.

Web Title: Siddharth Jadhav Divorce His Wife Trupti Change Her Surname Jadhav To Akkarwar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top