Siddharth Kiara Reception: सिद्धार्थ -कियारा यांच्या मुंबई रिसेप्शनची पहिली झलक, व्हिडिओ होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

siddharth malhotra and kiara advani

Siddharth Kiara Reception: सिद्धार्थ -कियारा यांच्या मुंबई रिसेप्शनची पहिली झलक, व्हिडिओ होतोय व्हायरल

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचा फेब्रुवारी २०२३ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर दोघांनी दिल्लीत रिसेप्शनचे आयोजन केले होते. आता हे कपल मुंबईत रिसेप्शन देत आहे. या रिसेप्शनमध्ये फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेक स्टार्स सहभागी झाल्याची माहिती आहे.

रिसेप्शनची तयारी पूर्ण झाली असून यादरम्यान व्हिज्युअल्सही यायला सुरुवात झाली आहे. सिड कियाराच्या या ग्रँड रिसेप्शनची पहिली झलक समोर आली आहे. परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे.

वीरल भियानीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सिड-कियाराच्या रिसेप्शन स्थळाचा आहे. व्हिडिओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांची नावे लिहिली असून नावांभोवती पांढरी फुले लावण्यात आली आहेत. कार्यक्रमस्थळाच्या स्वागत गेटवर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या नावाचे पहिले अक्षर म्हणजेच एसके लिहिलेले आहे.

ही जागा फुलांनी आणि पुष्पगुच्छांनी सजलेली आहे. या रिसेप्शनची तयारी किती खास आहे, याचा अंदाज व्हिडिओ पाहूनच लावला जाऊ शकतो. या जोडप्याचे रिसेप्शन मुंबईतील सेंट रेजिस येथे आयोजित करण्यात आले असून साडेआठ नंतर पार्टी सुरू होईल.

पाहुण्यांबद्दल बोलायचे झाले तर या ग्रँड रिसेप्शनमध्ये चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक पाहुणे येणार असल्याची चर्चा आहे. त्यात रणबीर कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन, शाहिद कपूर, मीरा राजपूत, भूषण कुमार आणि करण जोहरसह अनेक स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. करण जोहर या जोडप्याच्या लग्नात खास पाहुणा होता आणि तो नक्कीच रिसेप्शनचा भाग असेल.

लग्नाबद्दल बोलायचे झाले तर 7 फेब्रुवारी 2023 रोजी दोघांचे लग्न झाले. हे लग्न खूप खास होते आणि यादरम्यानचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. कियाराने हळद आणि मेहंदीचे न पाहिलेले फोटोही शेअर केले आहेत जे खूप सुंदर आहेत. राजस्थानातील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या जोडप्याने लग्न केले.

यानंतर जवळच्या नातेवाईकांसाठी दिल्लीत रिसेप्शनही ठेवण्यात आले होते. अलीकडे कियारा अडवाणीने तिचा इंस्टाग्राम प्रोफाइल फोटोही बदलला आहे. तिने लग्नादरम्यानचा एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये सिद्धार्थ तिला किस करताना दिसत आहे.