कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचं ब्रेकअप; समोर आलं मोठं कारण Kiara Advani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth Malhotra And Kiara Advani End Their Relationship

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचं ब्रेकअप; समोर आलं मोठं कारण

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी(Kiara Advani) यांचं ब्रेकअप झाल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पण या बातमीमुळे त्यांचे चाहते मात्र नाराज झालेले दिसत आहेत. सिद्धार्थ-कियाराची लव्हस्टोरी सुरु झाली ती 'शेरशहा'च्या सेटवर. त्यानंतर या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केलं गेलं. त्यांच्यातील लव्ह केमिस्ट्रीही प्रत्येकवेळेला दिसली होती. अगदी शॉपिंग,एअरपोर्ट,पुरस्कार सोहळे अशा सगळ्याच ठिकाणी त्यांची हजेरी बातम्यांची हेडलाईन बनली होती. पण आता अचानक या लव्हबर्ड्समध्ये काय बिनसलं की यांनी थेट ब्रेकअप केलं यावर अधिक बोललं जात आहे.

kiara advani birthday post for sidharth Malhotra

kiara advani birthday post for sidharth Malhotra

आतापर्यंत या दोघांनीही आपल्या नात्याविषयी कधीच-कुठे काहीही बोललेलं नाही, ना कुठे नात्याचं कन्फर्मेशन दिलेलं. काही दिवसांपूर्वी बातमी होती की सिद्धार्थ आणि कियारानं २०२२ या नवीन वर्षाचं स्वागत एकत्र केलं तेही थेट रणथंबोरच्या जंगल सफारीचा आस्वाद घेत. इतकंच नाही तर जेव्हा रणबीर-आलियाच्या लग्नाची बातमी सगळीकडे हवा करुन होती तेव्हाच सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचीही बातमी उडती कानावर आली होती. त्यामुळे अर्थातच यांचे चाहते भलतेच खुश झालेले. पण आता दोघांच्या ब्रेकअपची बातमी कानावर आल्यानं त्यांचं लग्न हे स्वप्नच राहणार बहुधा असं वाटायला लागलं आहे.

हेही वाचा: विल स्मिथनं अचानक मुंबई का गाठली? भगव्या वस्त्रात सोबत दिसले धार्मिक गुरु

बॉलीवूड लाइफला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,''कियारा आणि सिद्धार्थ आता यापुढे एकत्र दिसणार नाहीत. त्या दोघांनी आता एकमेकांना भेटणं बंद केलं आहे. त्यामुळे त्यांच्यात जे प्रेमाचं नातं होतं ते आता संपलं आहे. त्यांनी पुन्हा जर आपल्या नात्यावर विचार केला तर कदाचित नात पुन्हा पहिल्यासारखं होण्याची आशा आहे. पण सध्यातरी असं काहीच दिसत नसल्याचं म्हटलं गेलंय.'' बॉलीवूडमध्ये याआधी अनेक ब्रेकअप झाले आहेत. कियारा-सिद्धार्थ हे काही नवीन ब्रेकअप झालेलं कपल नव्हे. पण अगदी लग्न करणार अशी चर्चा रंगली असताना ब्रेकअप झाल्याची बातमी धडकणं हे सिद्धार्थ-कियाराच्या चाहत्यांसाठी थोडं जड जाणार हे नक्की.

Web Title: Sidharth Malhotra And Kiara Advani End Their

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top