विल स्मिथनं अचानक मुंबई का गाठली? भगव्या वस्त्रात सोबत दिसले धार्मिक गुरु Will Smith | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Will Smith clicked at private airport in Mumbai after Oscars controversy

विल स्मिथनं अचानक मुंबई का गाठली? भगव्या वस्त्रात सोबत दिसले धार्मिक गुरु

२०२२ च्या ऑस्कर(Oscar) सोहळ्यातलं विल स्मिथचं (Will Smith) थप्पड प्रकरण जोरदार गाजलं. यामुळे विल स्मिथला ऑस्कर अकादमीनं शिक्षाही सुनावली. या सर्वांबद्दल आपल्या सगळ्यांना आतापर्यंत सगळंच माहित झालं आहे. विल स्मिथची पत्नी जेडाची ऑस्कर सोहळ्यात निवेदक आणि प्रसिद्ध कॉमेडीयन ख्रिस रॉकनं (Chris rock) सर्वांसमक्ष थट्टा केल्यानंतर थप्पड नाट्य घडलं. विल स्मिथनं रागानं मंचावर जाऊन ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावलेली सगळयांनीच पाहिली अन् त्यानंतर माफी मागूनही विल स्मिथला ऑस्कर अकादमीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. त्या थप्पड प्रकरणानंतर विल स्मिथ आज २३ एप्रिल,२०२२ रोजी थेट मुंबई विमानतळावर दिसला. त्याच्यासोबत असलेल्या भगव्या वस्त्रधारी व्यक्तीमुळं मात्र आता भलतीच चर्चा रंगली आहे. विल स्मिथ मुंबईत धार्मिक विधी करण्यासाठी आला होता असा यानंतर अंदाज लावला जात आहे. तो भारतात कधी पोहोचला आणि कुठल्या शहरात राहत होता याविषयी अद्याप काही कळलेलं नाही. पण लोकांनी मात्र अंदाज लावायला सुरुवात केली आहे की, थप्पड प्रकरणानंतर विलनं मनःशांतीसाठी धार्मिक विधी करण्याचं योजलं असणार आणि त्यासाठीच त्यानं भारत गाठलं आहे.

सांगायचं झालं तर,विल स्मिथचं भारताशी खास नातं आहे. हरिद्वारला त्यानं याआधी भेट दिली आहे आणि तिथं तो रमला देखील होता. त्यावेळी विलनं भगवान शंकराचा रुद्राभिषेकही केला होता. आणि गंगा आरतीचा देखील आनंद घेतला होता. हरिद्वार भेटीनंतर त्यानं म्हटलं देखील होतं की,''भारतातले हरिद्वारमधले दिवस मी खूप एन्जॉय केले''. या हरिद्वार यात्रेला त्यानं अद्भुत आणि अलौकिक अशी उपमा दिली होती.

will smith at mumbai -private airport

will smith at mumbai -private airport

विल स्मिथची हिंदू धर्मावर खूप श्रद्धा आहे,भारतात आल्यावर म्हणे त्याने आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला हात देखील दाखवला होता आणि आपली जन्मपत्रिका देखील बनवून घेतली होती. एवढंच नाही तर या हॉलीवूड स्टारनं २०१८ च्या आपल्या हरिद्वार भेटी दरम्यान ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु जग्गी वासुदेव यांची भेटही घेतली होती. या भेटीचे फोटो त्यावेळी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. स्वतः जग्गी वासुदेव यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर विलसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यांनी लिहिलं होतं, ''विल,आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं खूप चांगला अनुभव होता. मी आशा करतो की, हिंदू धर्म नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करेल''.

हेही वाचा: 'बायकोसाठी त्याच्या कानफटात मारली,तिनं माझीच जिरवली'; विल - जेडाचा घटस्फोट?

ऑस्कर थप्पड प्रकरणानंतर विल स्मिथच्या अडचणी खूपच वाढल्या आहेत. म्हटलं जातंय की,त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही पत्नी जेडासोबत तणाव सुरु आहे. पती-पत्नीमधील वाद आता घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे.

Web Title: Will Smith Clicked At Private Airport In Mumbai After Oscars

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top