Sidharth Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराचं लग्न तर होणार मात्र हनिमून कॅन्सल करावा लागणार कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth Malhotra & Kiara Advani Wedding

Sidharth Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराचं लग्न तर होणार मात्र हनिमून कॅन्सल करावा लागणार कारण...

बॉलिवूड सिनेस्टार सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या स्टार कपलचे लग्न राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये होणार आहे. जिथे दोन्ही स्टार्स आणि त्याचे कुटूंबही पोहोचले आहेत. या स्टार कपलच्या लग्नाचे विधी ५ फेब्रुवारीला होणार आहे.

तर, दोघेही 6 फेब्रुवारी 2023 रोजी सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांचे कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसमोर लग्न बंधनात अडकणार आहे. दरम्यान, या स्टार कपलच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही मोठी बातमी बनत आहे.

आता अशी चर्चा आहे की लग्नानंतर लगेचच सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी त्यांच्या ड्रीम हनीमूनसाठी निघू शकणार नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या वर्क कमिटमेंट्समध्ये बांधले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नानंतर हनिमूनचे प्लॅनिंग लगेच करु शकणार नाही.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स वेब सीरिज पुलिस फोर्स व्यतिरिक्त त्याच्या अलीकडील रिलीज मिशन मजून बद्दल चर्चेत आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच कार्तिक आर्यन स्टारर सत्यप्रेम की कथा या चित्रपटात व्यस्त होणार आहे.

सिद्धार्थ आणि कियारा दोघांनाही त्यांचे लग्न खूप इंटीमेट ठेवायचे आहे आणि म्हणूनच खूप कमी लोकांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाहुण्यांबद्दल बोलायचे झाले तर, हे कपल त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त फक्त काही खास मित्रांना लग्नासाठी आमंत्रित करणार आहे.