कियाराने सिद्धार्थला केला फोन, म्हणाली....

ब्रेकअपच्या चर्चेनंतर सिद्धर्थ कियारा दिसले रोमँटिक मूडमध्ये.
कियाराने  सिद्धार्थला केला फोन, म्हणाली....
esakal

गेल्या काही दिवासांपासून बी टाऊनमध्ये सिद्धार्थ आणि कियाराच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. शेरशाह चित्रपटानंतर दोघे एकमेकांनी डेट करत होते. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण काही दिवसांपूर्वी कियारा आणि सिद्धार्थचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच दोघे पुन्हा एकत्र आले असून त्यांचा रोमँटीक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये किआरा आणि सिद्धार्थ एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी 'भूल भुलैया 2' च्या स्क्रिनिंगसाठी एकत्र आले होते. दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कियाराने  सिद्धार्थला केला फोन, म्हणाली....
लग्नाच्या प्रश्नावर कियाराने दिलेल उत्तर पाहून सिद्धार्थ बसला धक्का

सुत्रांच्या माहितीनुसार, 'भूल भुलैया 2' च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी कियाराने थेट सिद्धार्थला कॉर करुन आमंत्रित केलं होते. दोघांमध्ये फोनवरुन संवाद होताच दोघे भावुक झाले. त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. ही चूक झाल्याचं दोघांच्या लक्षात आलं. तो कॉल खूप भावनिक होता.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांनी मिठी मारताना दिसत आहेत.

सिद्धार्थ आणि कियारा शेरशाह चित्रपटात दिसलं होते. या चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. तर कियाराने डींपल चीमाची भूमिका निभावली होती.

कियाराने  सिद्धार्थला केला फोन, म्हणाली....
कियारासोबतच्या 'ब्रेक-अप'वर सिद्धार्थची पोस्ट व्हायरल

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कियारा भूल भुलैया २ मध्ये दिसणार आहे. तर तिचा आगामी चित्रपट जुगजुग जीयो रीलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर दिसणार आहेत.

तर सिद्धार्थ मल्होत्रा रश्मिका मंदानासोबत मिशन मजनू या चित्रपटात दिसणार आहे. सध्या तो रोहित शेट्टीची वेब सीरीज इंडियन पुलिस फोर्स चे शुटिंग करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com