सिंधूताई ‘मराठी करोडपती’मध्ये

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

अनाथांच्या माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ ‘कलर्स मराठी’वरील ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या मंचावर आल्या होत्या. नेहमीच इतरांना मोलाचे उपदेश देणाऱ्या आणि अनाथांसाठी झटणाऱ्या सिंधूताई अनाथांसाठी संस्थाही चालवतात. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. या कार्यक्रमात सिंधूताईंनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या आठवणी सांगताना ‘स्वत:च्या सुखात इतरांचे दु:ख विसरू नका’ असा मोलाचा संदेश दिला. कोण होईल मराठी करोडपतीचे ‘सुखाचा शुभारंभ’ अशी टॅगलाइन घेऊन तिसरे पर्व चालू झाले.

अनाथांच्या माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ ‘कलर्स मराठी’वरील ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या मंचावर आल्या होत्या. नेहमीच इतरांना मोलाचे उपदेश देणाऱ्या आणि अनाथांसाठी झटणाऱ्या सिंधूताई अनाथांसाठी संस्थाही चालवतात. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. या कार्यक्रमात सिंधूताईंनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या आठवणी सांगताना ‘स्वत:च्या सुखात इतरांचे दु:ख विसरू नका’ असा मोलाचा संदेश दिला. कोण होईल मराठी करोडपतीचे ‘सुखाचा शुभारंभ’ अशी टॅगलाइन घेऊन तिसरे पर्व चालू झाले. सिंधूताईंच्या असंख्य लेकरांच्या सुखाचा शुभारंभ करायला ‘कोण होईल मराठी करोडपती’ची किती मदत होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Web Title: sindhutai sapkal in kon hoil marathi karodpati