esakal | आशाजींचा कारमध्ये रियाज,त्यावर ड्रायव्हरची गंमतीशीर प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

singer asha bhosle

आशाजींचा कारमध्ये रियाज,त्यावर ड्रायव्हरची गंमतीशीर प्रतिक्रिया

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारतीय मनोरंजन क्षेत्रात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला शो म्हणून इंडियन आयडॉलचे (indian idol) नाव घ्यावे लागेल. यंदा या मालिकेचा बारावा सीझन (indian idol 12) सुरु आहे. गेल्या एक दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन केले आहे. त्यात येणारे सेलिब्रेटी हा देखील प्रेक्षकांच्या उत्सुकता आणि आनंदाचा विषय असतो. पुढील भागात बॉलीवूडमधील प्रसिद्घ गायिका आशा भोसले (asha bhosle) या शो मध्ये येणार आहेत. यापूर्वीच्या काही भागांमध्ये देखील त्यांनी उपस्थिती लावली होती. सध्या त्या चर्चेत आल्या आहेत. त्याचे कारण त्यांनी बाराव्या सीझनमध्ये आपल्या रियाजाबद्दल सांगितलेली एक आठवण. (singer asha bhosle practised aaja aaja her car driver thought gasping breath)

इंडियन आयडॉलच्या नव्या भागात आशा भोसले (Asha bhosle) यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी त्यांची सदाबहार गाणी सहभागी स्पर्धक सादर करणार आहेत. दरम्यान आशाजी यांनी आपल्या काही वेगवेगळ्या आठवणी प्रेक्षकांसोबत शेयर केल्या आहेत. त्या ऐकून प्रेक्षक थक्क झाल्याचे दिसून आले आहेत. सध्या सोशल मीडियावर या शो च्या आगामी भागाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

आशाजी यांनी 1966 मध्ये आलेल्या तिसरी मंजिल या चित्रपटात आजा आजा मैं हू प्यार तेरा नावाचे गाणे गायले होते. अर्थात ते गाणं आजही प्रेक्षकांच्या पसंतीचे गाणे आहे. त्या गाण्याची एक वेगळी आठवण आशाजी यांनी याप्रसंगी प्रेक्षकांना सांगितली. या गाण्याचा रियाज करत असताना एक अपघात झाला. त्यानंतर त्यांना हे गाणं गायचं की नाही, असा प्रश्न पडला होता. आशाजी यांनी सांगितलं, ते गाणं माझ्यासाठी अवघड गाणं होतं. आरडी बर्मन (r d burman) एकदा घरी आले. आणि पेटी घेऊन ते गाणं मला गायलं सांगितलं. त्यांनी जेव्हा पेटी वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा मला काय करावं कळेना.

हेही वाचा: ऑनलाइन शॉपिंगमध्ये शाहिदच्या पत्नीची फसवणूक

हेही वाचा: मुंबई दंगलीच्या वेळी दिलीप कुमार-शरद पवार भेटीचा फोटो, शबाना आझमींनी केला शेअर

मी आर डी यांना सांगितलं की, चार पाच दिवसांच्या रियाजानंतर हे गाणं गायचं की नाही हे सांगते. त्यानंतर मी या गाण्याचा कारमध्ये रियाज करत होते. तेव्हा माझा ड्रायव्हर वैतागला. त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाला, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे का, कारण त्याला असं वाटलं की, मला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. तो एक गंमतीशीर प्रसंग होता. आणि तो अजूनही माझ्या लक्षात आहे. हे गाणं आशाजी यांच्यासोबत मोहम्मद रफी यांनी देखील गायलं होतं.

loading image