singer Cheryl baker become broke now selling her furniture
singer Cheryl baker become broke now selling her furniture

प्रसिध्द गायिकेवर घरातलं फर्निचर विकायची आली वेळ; ग्लॅमर इंडस्ट्रीचं वास्तव

मुंबई - कोरोनाच्या काळात सगळ्यांना मोठ्या पेचात टाकले. अनेकांच्या नोक-या गेल्या. कित्येकांचा रोजगार बुडाला. कामावरुन कमी करण्यात आलेल्यांची संख्याही मोठी होती. लॉकडाऊन मध्ये सर्वाधिक प्रमाणात आर्थिक समस्येला सामोरं जाणा-यांची संख्याही प्रचंड आहे. बेकार असणा-यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ सामान्य नागरिक नव्हे तर मोठमोठे सेलिब्रेटींनाही पैशांची चणचण जाणवू लागली आहे. अशाच एका प्रख्यात गायिकेच्या जवळ पैसाच राहिला नाही.

सध्या प्रसिध्द गायिका चेरील बेकर ही मोठ्या आर्थिक समस्येत आहे. त्यामुळे तिला चक्क आपल्या घरातील फर्निचर विकावे लागले आहे. चेरिलनं ही माहिती दिली आहे. तिनं सांगितले की, सातत्यानं चालणा-या लॉकडाऊनमुळे चेरील जवळचा पैसा संपला अशावेळी ती कर्जबाजारी झाली. अशा परिस्थितीतून काय मार्ग काढावा असा प्रश्न तिला पडला. मात्र सगळ्याचे सोंग आणता येतं पैशाचं नाही. अशावेळी चेरिलनंही घरातील फर्निचर विकायला सुरुवात केली. ती बातमी वा-यासारखी व्हायरल झाली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असणा-या चेरीलच्या चाहत्यांनी तिचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना चेरिलनं सांगितले की, मी जेव्हा 21 वर्षांची होते तेव्हा मी पेन्शनसाठी प्रीमिअम द्यायला सुरुवात केली होती. मात्र दरवेळी कोणत्या तरी कारणासाठी ते पैसे मला काढावे लागले होते. सध्या मला पेन्शनच्या आधारावर गुजराण करावी लागत आहे. त्याच्यावर कसे बसे दिवस ढकलावे लागत आहे. परिस्थिती मोठी दयनीय आहे. सध्या मी 66 वर्षांची असून माझ्यासारख्या इतर कुणावरही अशी वेळ येऊ शकते. त्यांना समजेल माझ्यावर काय वेळ आली आहे ती.

चेरीलनं सांगितले की, आता मला माझ्या मुली सामान विकण्यासाठी मदत करत आहे. कपडे आणि इतर सर्व प्रकारच्या वस्तु विकण्यावर आम्ही भर देत आहोत. मला कुठलीही महागडी ज्वेलरी मिळालेली नाही. जी आहे ती खोटी आहे. म्हणून आता मला घरातील फर्निचर विकावे लागत आहे. भिंतीवर टांगलेले महागडे पेंटिंगही पैशांसाठी विकावे लागत आहे. मागील महिन्यात चेरीलनं आपली गाडी विकली होती. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com