हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक ख्रिस ब्राउनवर बलात्काराचा आरोप

पीडित महिलेनं यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
Chris Brown
Chris BrownGoogle

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि गीतकार ख्रिस ब्राऊन(Chris Brown) याच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आोप केला आहे, पीडित महिलेनं कॅलिफोर्नियामध्ये ख्रिसवर हा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. खिसने आधी आपल्याला चालाखीने अमली पदार्थ सेवन करण्यास दिले आणि त्यानंतर मुघल डिडिच्या फ्लोरिडा येथील एका यॉटमध्ये आपल्यावर बलात्कार केला असं तिनं तक्रार करताना नमूद केलं आहे.

Chris Brown
Video: मौनीला हे शोभतं का?आपल्याच लग्नात बार काऊन्टरवर चढून कोण नाचते

पीडित महिलेने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे की,''गायक ख्रिस ३० डिसेंबर रोजी मियामीमध्ये पोहोचला. त्यानंतर त्याने त्या महिलेला तिथे बोलावले. त्यानं फसवून तिला काहीतरी प्यायला दिले,ते प्यायल्यानंतर त्या महिलेला अस्वस्थ वाटू लागले. पुढे ख्रिस तिला एका बेडरूममध्ये घेऊन गेला,तिथे तिच्या संमतीविना तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी तो जबरदस्ती करू लागला. तिनं विरोध केल्यावर ख्रिसनं तिच्यावर बलात्कार केला असं तीनं त्या आरोपपत्रात म्हटले आहे. या पीडित महिलेने ख्रिसकडून २० मिलियन डॉलरची मागणी केली आहे''.

Chris Brown
Podcast :'कमरेखालचे विनोद म्हणजे...' श्रेया बुगडेनं मारला सिक्सर

पीडित महिलेनं तक्रार दाखल करीत न्याय मागितला आहे. तिचं म्हणणं आहे,''मी तक्रार केल्यामुळे ख्रिसला धडा मिळेल अन् मी इतर महिलांसाठी उदाहरण ठरेल ज्यांच्यासोबत ख्रिस ब्राऊनने याआधी हे अशाप्रकारचं दृष्कृत्य केलं आहे''. तिने त्या आरोपपत्रात असंही सांगितलं आहे की,बलात्काराच्या दुसऱ्या दिवशी ख्रिसनं फोन करून तिला गर्भधारणा टाळण्यास सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com