Eknath Shinde: अहोरात्र मेहनत घेणारे मुख्यमंत्री, कार्तिकी गायकवाडने मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

आता कार्तिकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलीय. कारण सुद्धा तसंच खास आहे.
singer kartiki gaikwad meet cm eknath shinde at thane anand ashram
singer kartiki gaikwad meet cm eknath shinde at thane anand ashram SAKAL

Eknath Shinde Meet Kartiki Gaikwad News: सा रे ग म प फेम मराठमोळी गायिका कार्तिकी गायकवाड ही सोशल मीडियावर चर्चेतली अभिनेत्री. कार्तिकी गायकवाड तिच्या सुमधुर गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.

कार्तिकीला आजवर आपण अनेक रिऍलिटी शो मधून गायन करताना आणि परीक्षण करताना पाहिलंय. आता कार्तिकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलीय. कारण सुद्धा तसंच खास आहे.

(singer kartiki gaikwad meet cm eknath shinde at thane anand ashram)

singer kartiki gaikwad meet cm eknath shinde at thane anand ashram
Al Pachino: वयाच्या ८३ व्या वर्षी अल पचिनो बनला बाप, २९ वर्षीय गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म

कार्तिकीने सोशल मीडियावर एकनाथ शिंदेंचा फोटो पोस्ट केलाय. या फोटोखाली कार्तिकीने कॅप्शन लिहिलंय. कार्तिकी लिहिते..

"महाराष्ट्र शासनाकडून बाबांना कंठ संगीत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शासनाप्रती कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा एकनाथरावजी शिंदे साहेब यांची आनंद आश्रम ठाणे येथे सदिच्छा भेट घेतली.

singer kartiki gaikwad meet cm eknath shinde at thane anand ashram
Aparshakti Khurana: आता पुण्यात रग्बीचा थरार! अपारशक्ती खुराना आणि राहुल बोसने घेतला पुढाकार

कार्तिकी पुढे लिहिते, "महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब आपण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहात रात्री २ ३ वाजेपर्यंत आपण लोकांना भेटता हे काल प्रत्यक्ष पाहिले

एक व्यक्ती म्हणुन आपल्याविषयीचा आदर आणखी द्विगुणीत झाला.आपल्या पुढील कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा." अशा शब्दात कार्तिकीने एकनाथ शिंदेंबद्दल कौतुकास्पद भावना व्यक्त केल्या.

कार्तिकी गायकवाड(Kartiki Gaikwad) हे नाव 'लिटील चॅम्प- सारेगमप' च्या पहिल्या पर्वात घराघरात पोहोचलं. ती त्या पर्वाची विजेती ठरली अन् मग पुढे गायन क्षेत्रातला तिचा यशस्वी प्रवास सुरू झाला.

वारकरी सांप्रदायाची परंपरा लाभलेल्या,आळंदीत जन्म घेण्याचं पुण्य लाभलेल्या अन् वारीशी जन्मापासून कनेक्शन असलेल्या कार्तिकी गायकवाडनं अनेकदा पंढरपुर आणि वारीचं कनेक्शन समोर आलंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com