esakal | १४ हजार फूट उंचीवर दुमदुमले मराठमोळ्या लावणीचे स्वर
sakal

बोलून बातमी शोधा

kavita rajvansh program

१४००० फूट उंचीवर दुमदुमले मराठमोळ्या लावणीचे स्वर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

१४००० फूट उंचीवर ६० ते ६६ टक्के ऑक्सिजनचा अभाव असताना प्रचंड थंडी आणि धुळीचे लोट अशा वातावरणात नॉनस्टॉप एक तास गाण्याचा कार्यक्रम सादर करून भारतीय सैन्याचं मनोरंजन करण्याचा अनोखा विक्रम गायिका कविता राजवंश Kavita Rajvansh यांनी केला. १९७१ साली पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात पाकिस्तानने माघार घेतली. तसेच पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जाणारा बांग्लादेशही स्वतंत्र झाल्याला ५० वर्ष पुर्ण झाल्याचं औचित्य साधून भारतीय सैन्यदलातर्फे 'कॉल ऑफ द माऊंटन्स – २०२१' या कार्यक्रमाचे आयोजन लेह, लडाख येथे करण्यात आले होते. गेली दोन वर्ष कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य तसेच इतर जीवनावश्यक सुविधा पुरविण्यात भारतीय सैन्याचा खूपच मोठा वाटा होता. म्हणूनच भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय सैन्यदलातर्फे गो मॅजिक ट्रेल्सच्या संस्थापिका उमा सुधिंद्र आणि सेवानिवृत्त कर्नल सुनिल पोखरियाल व कर्नल व्ही. डी. सिंग यांच्याबरोबरच मुंबईच्या कौशिकी एंटरटेनमेंट्सच्या संचालिका कौशिकी राजवंश व पार्श्वगायिका कविता राजवंश यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कविता राजवंश या गेली ४२ वर्ष संगीतक्षेत्रात गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. रेडिओ, दूरदर्शन, कॅसेट, सीडी, चित्रपटांबरोबरच देश – विदेशात त्यांनी त्यांचे गाण्याचे कार्यक्रम सादर केले आहेत. तसेच त्यांनी अनेक सेवाभावी संस्था व पोलीस कल्याण निधीकरीता मदत केली आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना अनेक राज्यस्तरीय व ‘सावित्रीबाई फुले फेलोशिप’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर केंद्र शासनातर्फे फिल्म प्रमाणन बोर्ड (CBFC) यावर पॅनल मेंबर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा: किर्तनकार शिवलीला पाटील वादग्रस्त का ठरली?

भारतीय सैन्यात कोणत्याही प्रकारचा जात – पात – धर्म हा भेदभाव नसून देशप्रेम ही एकच भावना प्रत्येक जवानाच्या मनात रुजलेली असते. म्हणूनच गायिका कविता राजवंश यांनी वेगवेगळ्या भाषांतील गाणी या कार्यक्रमात सादर केली. समुद्रसपाटीपासून सुमारे १४००० फूट ते १८००० फूट उंचीचा प्रवास करत निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम सादर करणे हे एक खूप मोठं आव्हान होतं. केवळ ६० ते ६५ टक्के ऑक्सिजन असताना प्रचंड थंडी आणि धुळीचे लोट अशा वातावरणात हजारो जवानांच्या समोर कार्यक्रम सादर करणं ही भावनाच खूप मोठी अभिमानास्पद होती. परंतु कार्यक्रमाच्याच दिवशी तब्बेत बिघडल्याने त्यांना ऑक्सिजन लावला लागला. पण ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक - एक तास असे नॉनस्टॉप कार्यक्रम सादर केले. हे कार्यक्रम सादर करताना त्यांना आलेला आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, “जेव्हा मी मराठीत बोलायला सुरुवात केली तेव्हा एकच कल्ला झाला. तेव्हा मी लावणी सादर करणार होते, म्हणून जवानांना विचारलं की इथे किती जणांना शिट्या वाजवता येतात? तेव्हा शिट्ट्या आणि टाळ्यांची पुष्पवृष्टी झाल्यासारखं माला वाटलं आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला”.

loading image
go to top