esakal | प्रसिद्धीसाठी कायपण! नेहा कक्करची 'नौटंकी' पाहिलीये?
sakal

बोलून बातमी शोधा

Video: प्रसिद्धीसाठी कायपण! नेहा कक्करची 'नौटंकी' पाहिलीये?

Video: प्रसिद्धीसाठी कायपण! नेहा कक्करची 'नौटंकी' पाहिलीये?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सोशल मीडियामुळे बॉलीवूड (bollywood) सेलिब्रेटींना प्रसिद्धीसाठी नवे माध्यम मिळाले हे जरी खरे असले तरी दुसरीकडे त्याचा अतिरेक होत असल्याचे दिसून आले आहे. आपल्या हटकेपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नेहा कक्करची लोकप्रियता मोठी आहे. तिनं यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावरुन फोटो आणि व्हिडिओ शेयर केले असून त्याला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांनी कमेंटही दिल्या आहेत. दुसरीकडे तिला ट्रोलही केले आहे. काहींनी तिला केवळ प्रसिद्धीसाठी अशाप्रकारचे व्हि़डिओ ती पोस्ट करत असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये आघाडीची गायिका म्हणून नेहा कक्करचे (Neha Kakkar) नाव घेता येईल.

नेहाचा (Neha Kakkar) जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात ती म्हशीचे दूध काढताना दिसत आहे. तिनं तो व्हिडिओ इन्स्टावर शेयर केला आहे. तिच्या फॅन क्लबनं तो व्हिडिओ शेयर केला आहे. त्या व्हि़डिओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत. काहींनी त्यात तिचं कौतूक केलं आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोलही केले आहे. नेहा तुला अशाप्रकारचे काम शोभते, तर प्रसिद्धीसाठी तु अशाप्रकारची नौंटकी करत असल्याचे तिला ट्रोलर्सनं सुनावले आहे. काहीशा घाबरलेल्या स्थितीत नेहा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये तिच्या शेजारी एक व्हिडिओदेखील आहे.

व्हिडिओमध्ये ती म्हणते, ही मला मारेल, एवढचं नाही तर जेव्हा ती म्हशीचे दूध काढते तेव्हा तिला वेदना तर होणार नाही ना, अशाप्रकारचे प्रश्न विचारुन तिनं ट्रोलर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यावरुन तिला वेगवेगळ्या कमेंट आल्या आहेत. त्यात तिला टार्गेट करण्यात आले आहे. दूध काढून झाल्यावर तिथून पळतानाही नेहा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

तिच्या चाहत्यांनी जेव्हा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा तिचं कौतूक करण्यात आलं. काहींनी तिला ओव्हरअॅक्टिंग केली आहे. असं म्हणत ट्रोलही केलं आहे. नेहा नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेयर करताना दिसते. देशातील आघाडीची गायिका प्रसिद्धीसाठी काहीही करते अशाप्रकारे तिला कमेंट करण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील नेहाचे व्हिडिओ चाहत्यांसाठी आणि तिच्या ट्रोलर्ससाठी चर्चेचा विषय राहिले आहेत. सोशल मीडियावर नेहाचा चाहतावर्ग (Neha Kakkar Instagram followers) मोठा आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या 63 मिलियन एवढी आहे.

हेही वाचा: गायिका नेहा कक्कर लग्नानंतर पहिल्यांदाच पती रोहनप्रीतसोबत झळकणार पडद्यावर

हेही वाचा: गायिका नेहा कक्कर प्रेग्नंट नाही, बेबी बंपच्या फोटोचं सत्य आलं समोर

loading image
go to top