गायिका नेहा कक्कर प्रेग्नंट नाही, बेबी बंपच्या फोटोचं सत्य आलं समोर

neha rohanpreet
neha rohanpreet

मुंबई- बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने नुकताच एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये नेहा तिचं बेबी बंप फ्लॉंट करताना दिसून आली होती. हे फोटो काही क्षणातंच सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. लोकांनी नेहा आणि तिचा पती रोहनप्रीतला शुभेच्छा देखील दिल्या. मात्र हे सत्य आहे की नेहा प्रेग्नंट नाहीये. नेहाने हे फोटो का शेअर केले होते त्याचं सत्य आता समोर आलं आहे. 

गायिका नेहा कक्करचं गेल्याच महिन्यात पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत लग्न झालं होतं. त्यानंतर तिने नुकतंच तीचं बेपी बंप फ्लॉंट करतानाचा फोटो शेअर केला होता. सोशल मिडियावर या फोटोंची खूप चर्चा झाली. मात्र त्यानंतर नेहा प्रेग्नंट नसल्याचं समोर आलं. नेहाने एका गाण्याच्या प्रमोशनसाठी हा पब्लिसिटी स्टंट केल्याचं आता समोर आलंय. त्यामुळे सोशल मिडियावर ती चांगलीच ट्रोल होतेय. 

नेहाने तिच्या आगामी गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करताना तिने लिहिलंय, 'ख्याल रखया कर २२ डिसेंबरला येत आहे.' याआधी नेहाने तिचा बेपी बंप असलेला रोहनप्रीतसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं होतं की ख्याल रखया कर. यावर पती रोहनप्रीतने कमेंट करत म्हटलं की 'आता तर जास्त काळजी घ्यावी लागेल.' नेहाच्या या स्टंटमुळे सोशल मिडियावर युजर्सचा पारा चढलेला पाहायला मिळतोय. प्रेग्नंसीच्या बातमीचा उपयोग करुन गाण्याचं प्रमोशन केल्याने लोकांनी तिला धारेवर धरलं आहे. नेहा आता चांगलीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. 

नेहाचं लग्न चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी देखील इंडियन आयडल शोमध्ये आदित्य नारायणसोबत लग्न केल्यानंतर ती चर्चेत आली होती. सोशल मिडियावर जेव्हा याची खूप चर्चा झाली तेव्हा हे सगळं केवळ शोच्या टीआरपीसाठी केल्याचं समोर आलं होतं.   

neha kakkar pregnant picture is publicity stunt for her new music video fans troll her  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com