राहुलचं वाजलं, अखेर 'दिशा' मिळाली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

singer rahul vaidya and disha parmar marriage video goes viral ali goni and jasmin bhasin also present
singer rahul vaidya and disha parmar marriage video goes viral ali goni and jasmin bhasin also present
Updated on

मुंबई - बिग बॉसचा यंदाचा सीझन प्रसिध्द गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्यामुळे भलताच लोकप्रिय झाला होता. त्या दोघांनीही यानिमित्तानं मोठा फॅन फॉलोअर्स गोळा केल्याचे दिसुन आले आहे. या शो च्या वेळी त्यांच्या अफेअरची चर्चाही रंगली होती. राहूलच्या अगोदर दिशा शो मधून बाहेर पडली होती. राहूलचा अंतिम तीन स्पर्धकांमध्ये समावेश होता. मात्र त्याच्या वाट्याला यश काही आले नाही. यानिमित्तानं त्याच्या आणि दिशाच्या अफेअरची चर्चाही फार झाली. शो च्या दरम्यान राहूलनं तिला प्रपोझही केलं होतं. त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली होती. ते लवकरच लग्न करणार आहेत अशीही चर्चा होती. राहूलनं शो संपल्यानंतर लग्न करु असे सांगितले होते. अखेर हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांचा लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर दिशा आणि राहूलचा सात फेरे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला त्या दोघांच्याही चाहत्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी नक्क लग्न केलं आहे का असा प्रश्नही त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. बिग बॉसच्या 14 व्या सीझनमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणून राहूल आणि दिशाचं नाव घ्यावं लागेल. त्यांनी यावेळी मोठी लोकप्रियता मिळवली. हा शो अधिक हिट होण्यासाठी त्यांची मदत झाल्याचेही दिसुन आले. बिग बॉसच्या घरात असताना राहूलनं दिशाला लग्नासाठी प्रपोझ केलं होतं. त्याचे फोटोही त्यावेळी व्हायरल झाले होते. आता त्या दोघांनीही गुपचूप लग्न केलं आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्यांच्या लग्नाची माहिती कळली आहे.

आम्ही लग्न केलं आहे असं त्यांनी आपआपल्या सोशल मीडियावर सांगितलं आहे. ज्यावेळी त्यांच्या फॅन्सनं तो व्हिडिओ पाहिला त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता त्यांनी त्या दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राहुलनं पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे, नवी सुरुवात. अनेकांनी राहुल आणि दिशाला हे लग्न कधी झालं? असा प्रश्न विचारला आहे. कारण त्यांना त्यांचे फोटो खरे वाटत नसल्याचे सांगितले आहे. कुठल्या तरी चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे का, असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com