गायिकेचं चाहत्यासोबत 'किळसवाणं' कृत्य; नंतर मागितली माफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायिकेचं चाहत्यासोबत 'किळसवाणं' कृत्य; नंतर मागितली माफी
गायिकेचं चाहत्यासोबत 'किळसवाणं' कृत्य; नंतर मागितली माफी

गायिकेचं चाहत्यासोबत 'किळसवाणं' कृत्य; नंतर मागितली माफी

सोशल मीडियावर आपण पाहतो की, चाहते त्यांच्या आवडीच्या सेलिब्रेटीसाठी वेडे असतात. त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. आपल्या आवडीच्या कलाकाराची एक छबी पाहायला मिळावी म्हणून ते जीवाचा आटापिटाही करत असतात. याउलट काही सेलिब्रेटी असेही असतात जे चाहत्यांसोबत बेशिस्तपणे वागतात. त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागत असल्याचे दिसून आले आहे. सध्या सोशल मीडियावर एका मोठ्या गायिकेनं तिच्या चाहत्यासोबत केलेल्या किळसवाण्या कृत्याची चर्चा सुरु आहे.

प्रख्यात गायिका सोफिया उरिस्ता ही तिच्या गाण्यासाठी जशी प्रसिद्ध आहे तशी ती तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्यासाठी देखील चर्चेत असते. तिनं आपल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये जे काही केले त्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तिनं चक्क चाहत्याच्या चेहऱ्यावरच मुत्रविसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकारामुळे गायिकेचे चाहतेही गोंधळून गेले आहेत. तिनं अशाप्रकारे चाहत्यांशी वर्तणूक करणे त्यांना काही पटलेलं नाही. त्यांनी तिच्या कृतीचा निषेध करत तिच्यावर टीकाही केली आहे. यात आणखी वेगळी गोष्ट म्हणजे सोफियानं आपल्या झालेल्या कृत्याबद्दल माफी मागत त्या चाहत्याकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर सोफियाचा माफीनामा व्हायरल झाला आहे. ब्रास अगेंस्टची लोकप्रिय गायिका म्हणून सोफिया उरिस्ताचे नाव घेतले जाते. ती नेहमी तिच्या हटके कृतीसाठी चर्चेत असते. तिनं केलेल्या प्रकारामुळे ब्रास अगेन्स्टनं देखील माफी मागितली आहे. सोफियानं लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलेल्या त्या प्रकारामुळे चाहते तिच्यावर नाराज झाले होते. तिला आता उपरती झाली असून त्यानिमित्तानं तिनं सोशल मीडियावर एक पोस्टही शेयर केली आहे. ती म्हणाली, मी स्टेजवर मर्यादा राखत वागायला हवे. मी नेहमीच तसा वागण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडून जी कृती झाली त्याबद्दल मी माफी मागते. 11 नोव्हेंबरला झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये तिनं हे कृत्य केलं होतं.

loading image
go to top