esakal | हनी सिंगच्या युएईमधील संपत्तीबाबत पत्नीची नवी याचिका; कोर्टाने बजावली नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

yo yo honey singh

हनी सिंगच्या युएईमधील संपत्तीबाबत पत्नीची नवी याचिका; कोर्टाने बजावली नोटीस

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दिल्ली कोर्टाने बॉलिवूड गायक यो यो हनी सिंगला Honey Singh नोटीस बजावली आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने दाखल केलेल्या नव्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील त्याच्या किंवा त्याच्या कंपन्यांच्या मालकीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर तिसऱ्या पक्षाचे अधिकार निर्माण करण्यापासून हनी सिंगला रोखण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

यो यो हनी सिंगवर पत्नी शालिनी तलवारने लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक छळ असे गंभीर आरोप केले आहेत. शालिनीने दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल केली. पतीने आपल्याला अनेकदा मारहाण केली. तो आणि त्याचे कुटुंबीय मला शारीरिक इजा पोहोचवतील या भीतीच्या छायेखाली मी सतत वावरत होते, असे शालिनीने सांगितले. हनी सिंगकडून होणाऱ्या या छळामुळे आपण नैराश्यात गेलो तसेच आपल्याला वैद्यकीय मदतीची गरज लागली, असे शालिनी तलवारने म्हटले आहे. तिने हनी सिंगवर फसवणुकीचाही आरोप केला आहे. त्याचे अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचा आरोप तिने केला आहे.

हेही वाचा: हृतिकच्या घराच्या भिंतीवरील ओल पाहून चाहतीचा प्रश्न; अभिनेत्याचं भन्नाट उत्तर

'कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही'; कोर्टाने हनी सिंगला फटकारलं

'कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही', अशा शब्दांत दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने हनी सिंगला फटकारलं होतं. पत्नीने दाखल केलेल्या कौटुंबिक अत्याचाराच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हनी सिंग गैरहजर होता. 'हे प्रकरण इतक्या हलक्यात कसं घेतलं जातंय, याचं आश्चर्य वाटतं. कोणीही कायद्यापेक्षा मोठं वर नाही', अशा शब्दांत महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांनी फटकारलं होतं.

loading image
go to top