Sirf Ek Banda Kaafi Hai Trailer : आसाराम बापूला शेवटपर्यत नडला, जेलमध्येच धाडला!

सोशल मीडियावर आलेल्या ट्रेलरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व सिंग कतरी यांनी केले असून त्याला आतापर्यत नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
Sirf Ek Banda Kaafi Hai Trailer
Sirf Ek Banda Kaafi Hai Trailer

Sirf Ek Banda Kaafi Hai Trailer अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या जेलमध्ये असणाऱ्या आसाराम बापुच्या त्या प्रकरणानं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या त्या प्रकरणावर चित्रपट येत असून त्यामध्ये आसाराम बापुच्या विरोधात कोर्टामध्ये लढणाऱ्या वकिलीची भूमिका प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीनं केली आहे. सिर्फ एक बंदा काफी है असे त्या चित्रपटाचे नाव असून त्याचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे.

सोशल मीडियावर आलेल्या ट्रेलरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व सिंग कतरी यांनी केले असून त्याला आतापर्यत नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. गुगलवर देखील ज्या व्यक्तीनं आसारामच्या विरोधात कोर्टामध्ये लढत दिली त्या व्यक्तिविषयी माहिती सर्च केली जात आहे.

हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून ज्या मुख्य व्यक्तिरेखेवर आधारित हा चित्रपट आहे त्यानं देशातील प्रसिद्ध वकील राम जेठमलानी, सलमान खुर्शीद आणि सुब्रमण्यम स्वामींसारख्यांची बोलती बंद केली होती. त्यामुळे तो वकील भलताच चर्चेत आला होता. मनोजच्या बंदा चित्रपटातून त्याविषयी अधिक खुलासा होणार आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Sirf Ek Banda Kaafi Hai Trailer
The Kerala Stroy चित्रपटाचा रामदास स्वामींशी खास संबंध.. अभिनेत्याचा Video व्हायरल

ही गोष्ट आहे राजस्थानमधील सेशन्स कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या पुनम चंद्र सोलंकी. बंदा या चित्रपटामध्ये ही व्यक्तिरेखा मनोज वाजेपयीनं साकारली आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या पोस्टरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षकांना मनोजच्या या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.

Sirf Ek Banda Kaafi Hai Trailer
Viral Video : 'नाचू किती, कंबर लचकली'; चिमुकलीच्या डान्सने मार्केट केलंय जाम; गौतमीलाही लाजवेल

बंदाविषयी अधिक माहिती देताना मनोजनं दिलेल्या मुलाखतींमधून बंदाविषयीची उत्सुकता वाढली आहे. वकील पुनम चंद्रा ही व्यक्तिरेखा एवढी महत्वाची का आहे याचे कारण म्हणजे, आसाराम बापूंना झालेली अटक, त्यांचे जेलमध्ये जाणे, या केसमध्ये पुनम चंद्रा यांची वकील म्हणून असणारी भूमिका महत्वाची होती.

याप्रकरणात सोलंकी यांना कोट्यवधी रुपयांचे अमिषही दाखवण्यात आले होते. मात्र ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com