सिया पाटीलचं आयटम सॉंग 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

हल्लीच्या चित्रपटांमध्ये आयटम सॉंग नाही, असं होतच नाही. मग तो मराठी सिनेमा असू दे किंवा हिंदी. नायिकांमध्येही आयटम सॉंग करण्यासाठी चढाओढ लागलेली असते. त्यात मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री सिया पाटीललाही प्रत्येक चित्रपटामध्ये आयटम सॉंग असायला पाहिजे, असं वाटतं. तिने तीन-चार आयटम सॉंग केलेली आहेत. तिच्या मते एखाद्या गाण्यामुळे सिनेमा हिटही ठरू शकतो. तसेच चित्रपटातील गंभीर सिच्युएशनमध्ये मूड चेंज करण्यासाठी किंवा चित्रपटात सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी आयटम सॉंग असतं. आयटम सॉंग करण्यासाठी आयटम गर्लच हव्यात असं नाही.

हल्लीच्या चित्रपटांमध्ये आयटम सॉंग नाही, असं होतच नाही. मग तो मराठी सिनेमा असू दे किंवा हिंदी. नायिकांमध्येही आयटम सॉंग करण्यासाठी चढाओढ लागलेली असते. त्यात मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री सिया पाटीललाही प्रत्येक चित्रपटामध्ये आयटम सॉंग असायला पाहिजे, असं वाटतं. तिने तीन-चार आयटम सॉंग केलेली आहेत. तिच्या मते एखाद्या गाण्यामुळे सिनेमा हिटही ठरू शकतो. तसेच चित्रपटातील गंभीर सिच्युएशनमध्ये मूड चेंज करण्यासाठी किंवा चित्रपटात सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी आयटम सॉंग असतं. आयटम सॉंग करण्यासाठी आयटम गर्लच हव्यात असं नाही. कोणीही अशी गाणी करू शकतो आणि सर्वांना थिरकवायला लावू शकतो, असं सिया सांगते.

इंडो ऑस एण्टरटेन्मेंट, झुमका फिल्म्स, सासा प्रॉडक्‍शनच्या डॉ. प्रज्ञा दुगल, श्‍वेता देशपांडे आणि गणेश लोके निर्मित व प्रकाश जाधव दिग्दर्शित "शूर आम्ही सरदार' चित्रपटात "आली रे आली मुंबईवाली...' हे आयटम सॉंग सियाने केलंय. तिने या गाण्याची रिहर्सल न करता एका रात्रीत हे संपूर्ण गाणं शूट केलं आहे. खरं तर तिला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं. मात्र तिच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे तिने नकार दिला. पण निर्मात्यांनी एक गाणं तरी करावं अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे तिने हे आयटम सॉंग केलं.

याबाबत सिया म्हणाली की, "निर्मात्यांकडे वेळ कमी असल्यामुळे एका दिवसात या गाण्याचं शूटिंग केलं. ऐनवेळी तिथे जसं सांगितलं तसं मी केलं. हे गाणं मी आधी ऐकलेलंसुद्धा नव्हतं. एका रात्रीत या गाण्याचं चित्रीकरण पार पडलं. रात्री अकरा वाजता शूटिंगला सुरुवात झाली आणि सकाळी सहा वाजता पॅकअप केलं. सरावाशिवाय आयटम सॉंग चित्रीत केल्यामुळे खूप गडबड झाली होती. मात्र हे गाणं खूप छान झालंय. हा अप्रतिम अनुभव होता.' सियाने नुकतेच एका दाक्षिणात्य चित्रपटातही आयटम सॉंग व काही सीन केले आहेत.

 

 
 

Web Title: Is Siya Patil the next item queen?