Smita Patil Birth Anniversary : अन् मृत्यूनंतर स्मिताची शेवटीची इच्छा झाली पुर्ण!

Smita Patil Birth Anniversary :
Smita Patil Birth Anniversary :Esakal

Smita Patil Birth Anniversary : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील जरी आज या जगात नसल्या तरी त्यांचे चित्रपट आणि आठवणी आपल्यासोबत आहेत. आजही इंडस्ट्रीशी निगडित लोकांच्या आणि चाहत्यांच्या हृदयात त्या जिवंत आहेत. आजही त्यांचे चाहते त्यांचे चित्रपट आवडीने बघतात.

त्यांच्या चाहत्यांची संख्या ही कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा जास्त होती. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला आणि 13 डिसेंबर 1986 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती आणि मल्याळमसह 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.

आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि साधेपणाने त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केली होती, जी आजवरही तशीच कायम आहे. त्यांच्या आयूष्यातील अशाच काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असाव्यात.

Smita Patil Birth Anniversary :
Bigg Boss 17 Update: बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी सुरु झाले राडे! विकीला झापलं तर कुणामध्ये झालं कडाक्याच भांडण?

स्मिता पाटीलचा जन्म पुण्यातील शिवाजीराव पाटील यांच्या राजकारणी घराण्यात झाला. त्यांचे कुटुंब महाराष्ट्राच्या खान्देशातील शिरपूर येथील होते. त्यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नाटकाची फार आवड होती. 1975 'चरणदास चोर' चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अल्पावधीतच त्यांनी लोकप्रियता मिळवली.

त्यानंतर त्याचे ‘मंथन’ ,’भूमिका’, ‘जैत रे जैत’, ‘गमन’, ‘आक्रोश’ 'मंडी', 'अर्थ', 'आखिर क्यों', 'आज की आवाज', 'चक्र', 'मिर्च मसाला'असे बरेच चित्रपट बरेच गाजले. त्यांच्या चित्रपट कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

त्यानंतर1985 मध्ये त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामूळच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील होत्या ,त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ स्मिता पाटील पब्लिक स्कूल ही शाळा चालवली जाते.

Smita Patil Birth Anniversary :
Hema Malini's Birthday: बर्थडे 'ड्रीम गर्ल'चा अन् जल्लोष साऱ्या बॉलिवूडचा ! हेमा मालिनींचा 75 वा वाढदिवस जोरात साजरा

स्मिता ह्या त्यांच्या अभिनयाने जितक्या चर्चेत होत्या तेवढीच चर्चा त्यांच्या खासगी आयूष्याचीही होती. स्मिता आणि राज बब्बर यांच्या नात्याबद्दलही बरीच चर्चा केली होती. स्मिता आणि राज यांची भेट1982 मध्ये 'भीगी पलके'च्या शूटिंगदरम्यान झाली होती. या भेटीचे रुपांतर नंतर प्रेमात झालं.

राज बब्बर यांचे आधीच नादिरासोबत लग्न झाले होते तरीही दोघेही एकमेकांपासून लांब राहु शकले नाहीत आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

त्यानतंर राजने पत्नी नादिराला घटस्फोट दिला. राज आणि स्मिता लिव्ह-इनमध्ये राहू लागले, त्याकाळी लिव्ह-इनही संकल्पना इतकी विकसित नव्हती त्यामुळे दोघांवर बरीच टीका झाली होती. काही काळानंतर स्मिता आणि राज यांचे लग्न झाले. स्मिता यांचा हा निर्णयावर त्यांच्या आई-वडीलांना अजिबात आवडला नव्हता.

वयाच्या 31 व्या वर्षी 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांच्या बाळंतपणाच्यावेळी गुंतागुंत झाल्यामुळे मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 15 दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले.

Smita Patil Birth Anniversary :
Tiger 3 Trailer: सलमान-इम्रान राहिले बाजूला,चर्चा रंगली कतरिनाच्या टॉवेल सीनची

असं म्हणतात की, त्यांची शेवटची इच्छा होती की, त्यांचे जेव्हाही निधन होईल तेव्हा त्यांना नववधूप्रमाणे तयार करुन निरोप देण्यात याला. स्मिता यांचे 13 डिसेंबर 1986 रोजी निधन झाले.

त्यांच्या निधनानंतर त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली त्यांना वधूप्रमाणे तयार करुन त्यांचा मेकअप करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com