ग्रामीण व्यक्तिरेखेत दिसणार स्मिता तांबे.. येतोय हा चित्रपट..

अभिनेत्री स्मिता तांबे बऱ्याच दिवसांनी चित्रपटात झळकणार असून यंदा ग्रामीण जीवनातील स्त्रीची व्यक्तिरेखा तिने साकारली आहे. तिचा हा चित्रपट...
smita tambe news marathi movie 'lagan'
smita tambe news marathi movie 'lagan'

मालिका, नाटक, चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून रसिकमानवर अधिराज्य गाजावणाऱ्या स्मिता तांबेने वेब सिरीज मध्ये देखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 'लाडाची मी लेक ग' या झी मराठीवरील मालिकेत स्मिताने साकारलेली 'मम्मी' ची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. परंतु बऱ्याच दिवसात चित्रपटापासून दूर राहिलेली स्मिता आता पुन्हा एकदा एक दर्जेदार भूमिकेसह प्रेक्षक भेटीला आली आहे.

smita tambe news marathi movie 'lagan'
सध्या प्रेयसीच्या भूमिकेत असणारी शिल्पा तुळसकर तेव्हा स्वप्नील जोशीची आई झाली होती..

ग्रामीण विश्वावर आधारलेला 'लगन' हा चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 'राधा' असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. खेडयात राहणारी ऊसतोडणी करणाऱ्या कामगाराची भूमिका स्मिताने साकारली आहे. स्मिताने (smita tambe) या आधी अनेकदा ग्रामीण भूमिका साकारल्या आहेत. पण ही भूमिका काहीशी वेगळी आहे. एका स्त्रीच्या संघर्षाची ही कहाणी आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने स्मिताने बैलगाडी चालवण्यापासून ते ऊसाच्या भल्यामोठया मोळया डोक्यावर वागवण्यापर्यंत सर्व काही केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून अत्यंत वास्तवदर्शी असा हा चित्रपट आहे. या भूमिके विषयी बोलताना स्मिता म्हणाली, ‘हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंददायी आणि तेवढंच आव्हानात्मक होतं. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडपड असते. हे पात्र साकारताना, प्रत्येक आईची ती तळमळ दाखवणं, एवढंच मी या माझ्या भूमिकेतून केलं आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने गावातील जीवनपद्धती पुन्हा एकदा जवळून बघता आली याचा ही आनंद आहे’. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं असून जी.बी.एंटरटेंन्मेंट यांनी निर्मिती केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com