Ukraine: स्मृती इराणींची कल्लाकारी; चार भाषांमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत

Smriti Irani
Smriti IraniRussia-Ukraine crisis

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे दिल्लीत परतल्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात येथील विद्यार्थ्यांशी त्यांच्या लोकल भाषांमध्ये संवाद साधला आणि मायदेशी परतल्यावर त्यांचे स्वागत केले. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यावर लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओमध्ये स्मृती इराणी म्हणताना दिसत आहेत, “घरी स्वागत आहे! तुमचे कुटुंबीय तुमची वाट पाहत आहेत. तुम्ही धैर्य दाखवल्या बद्दल तुमचे आभार. फ्लाइट क्रूचेही आभार." (Smriti Irani welcomes Indian students from Ukraine in 4 different languages #OperationGanga)

स्मृती इराणी (Smriti Irani) प्रादेशिक भाषेत बोलत असताना, ट्विटर यूझर्सनी लिहिले, "श्रेय घेत रहा, प्रत्येक परिस्थितीत राजकारण असले पाहिजे." त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, “अरे देवा! हे सर्व विद्यार्थ्यांना सहन करावे लागत आहे. यात राजकारण नसावे."

युक्रेनमधून परतलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, ''आम्हाला भारतात परत आल्याने खूप आनंद होत आहे. २५ तारखेला निघालो आणि आज आलो. अजूनही अनेक मुलं तिथे अडकलेली आहेत, त्यांना सरकारने लवकर बाहेर काढावं.'' विशेष म्हणजे, युक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या परिस्थितीतून भारतीयांना परतण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांनी रोमानिया आणि हंगेरीसाठी हिंडन एअरबेसवरून उड्डाण केले. (Russia-Ukraine crisis)

भारतीय हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची आणखी तीन विमाने आज पोलंड, हंगेरी आणि रोमानियाला जात आहेत. ऑपरेशन गंगाचा एक भाग म्हणून C-17 ग्लोबमास्टरने आज पहाटे 4 वाजता रोमानियासाठी रवाना केले. आज युक्रेनचे एक विमान पोलंडहून दिल्लीला पोहोचले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, “आमची मुले तिथे शिकण्यासाठी गेली होती आणि त्यांना सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडणे हे सरकारचे ध्येय आहे. माझ्या मुलांचे घरी परतल्यावर त्यांचे स्वागत करताना मला समाधान वाटत आहे, आमचे सर्व विद्यार्थी परत येईपर्यंत हे मिशन चालू राहील.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com