
Sona Mohapatra : 'यशस्वी पुरुषांच्या मागे धावण्यात अर्थ नसतो बाई! सोनानं कुणाचे टोचले कान?
Sona Mohapatra : टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील त्या वादानं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पंजाबची कॅटरिना म्हणून जिच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या शहनाज गिलचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या शहनाजच्या सौंदर्याचे चाहत्यांना नेहमीच कौतूक असते.
बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका सोना महापात्रा ही तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.परखड वक्तव्यांसाठी ट्रोल होणाऱ्या सोनानं आता थेट शहनाजवर टीका केली आहे. जी तिच्या चाहत्यांना आवडलेली नाही. त्यामुळे चाहत्यांनी सोनाला चांगलेच सुनावले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोना आणि शहनाज यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहे.
Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये शहनाज गिलच्या परफॉर्न्मसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढही झाली होती. चाहत्यांना शहनाजचा तो अंदाज प्रचंड भावला होता. आता सोना महापात्रानं शहनाजवर टीका केली आहे. त्यामध्ये तिनं तिच्यावर वैयक्तिक स्वरुपाचे आरोप केले आहेत.
सोनानं काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन शहनाजवर टीका केली होती. अर्थात शहनाजच्या चाहत्यांनी सोनाचे ते बोलणे खटकले होते. त्यामुळे त्यांनी सोनावर चांगलीच आगपाखड केली होती. सोनानं आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नवीन काही शिकण्यासाठी पैसे खर्च करा, एखादी गोष्ट जमत नसेल तर आणखी कष्ट करा. तुमच्यात जी चांगली गोष्ट आहे त्याच्यामागे धावत सुटा. त्याचा फॉलो अप घ्या.
तुम्हाला माध्यम क्षेत्रांमध्ये काम करायचे आहे तर सतत प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही यशस्वी पुरुषांमागे धावलात, लोकप्रियता मिळवण्यासाठी काहीही करु लागतात तर त्याचा काही उपयोग होत नाही. हे लक्षात ठेवा. तुमच्याजवळ टँलेंट असण्याची गरज आहे. सोनानं व्यक्त केलेल्या या भावना शहनाजला उद्देशुन असल्याचे बोलले जात आहे.