तनिषा मुखर्जीचं 'शुभमंगल सावधान'?फोटोवर ट्रोलर्स म्हणाले,'म्हातारी..'

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून दाखवली लग्न झाल्याची खूण...
Tanishaa Mukerji
Tanishaa MukerjiGoogle
Updated on

तनिषा मुखर्जी(Tanishaa Mukarji) हे नाव कधीच मोठं झालं नसतं जर तिची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा नसत्या किंवा सुपरहिट सिनेमे देणारी अभिनेत्री काजोल तिची मोठी बहिण नसती. कारण तनिषा मुखर्जीनं आतापर्यंत जे काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके चार-पाच सिनेमे केलेयत त्यांनी बॉक्सऑफिसवर पोचताच हातपाय गाळलेयत. बॉलीवूडमध्ये तिला सुपरफ्लॉपचा टॅग तसाही लागलाय. मग बाईंना मुकाट्यानं बॉलीवूडला टाटा-बाय बाय करावा लागला अनं मग अधनं-मधनं कुठल्याशा वेब सिरीजमध्ये किंवा 'बिग बॉस' सारख्या शो मध्ये दर्शन झालं बाईंचं. 'बिग बॉस सिझन7' मध्ये तर उगाचच बिचा-या अरमान कोहलीला तनिषानं नादाला लावलं आणि घराच्या बाहेर आल्यावर ताटातनं खडा बाहेर काढावा तसं उचलून फेकून दिलं आपल्या आयुष्यातून .

तर असो, हे सगळं सांगायचं कारण की काही दिवसांपूर्वी लग्न करणार- नाही करणार अशा संभ्रमात असणारी तनिषा व्हॅकेशन सेलिब्रेट करायला गेली आणि चक्क लग्नच तिथे करून बसली अशी उडती खबर मिळाली आहे. तिनंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही असे फोटो शेअर केले आहेत ज्यांना पाहून तिनं लग्न केलंय अशी दाट शंका व्यक्त केली जात आहे.

Tanishaa Mukerji
कोव्हिडमुक्त झाल्यावरअर्जुन कपूरने मलायकासाठी केलं हे सॉल्लिड काम

तिनं एक फोटो शेयर केलायत ज्यात तिनं पायात जोडवी घातली आहेत. आता लग्न झाल्यानंतर पायात जोडवी घातली जातात हे सर्वप्रचलित आहेत. पण आता स्टाईल म्हणून बाईंनी जर ती जोडवी घातली असतील तर लग्नाच्या अफवेला आवरता आवरता नाकीनऊ येणार आहेत तनिषाला. चाहत्यांनी मात्र या फोटोवरून तिची खिल्ली उडवलीय. कुणीतरी म्हटलंय,'म्हाता-या बाईसारखे तुझे पाय वाटत आहेत'. आता पहायचं तनिषा लग्नाच्या अफवेला आणि लोकांच्या म्हातारी म्हणवून हिणवण्याला कसं काय उत्तर देते. एरव्ही सोशल मीडियावर हॉट आणि स्टायलिश फोटोंचा मारा करणारी तनिषा किती कडक शब्दात पलटवार करते हे पाहण महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com