सोनाक्षी बनली व्हिलन 

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या "नच बलिये' डान्स रिऍलिटी शो आणि "नूर' चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आलीय. तिचे "तेवर', "अकिरा' आणि "फोर्स 2' फारसे चालले नाहीत. तरीही तिच्या आगामी "नूर' अन्‌ "इत्तेफाक'ची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहताहेत. "इत्तेफाक'मध्ये ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसेल, असं सुरुवातीला बोललं जात होतं; मात्र आता ती खलनायिकेचा रोल साकारणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोनाक्षी "इत्तेफाक' चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहे. ती म्हणते, "पहिल्यांदाच मी खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थसोबतही मी प्रथमच काम करतेय. माझी भूमिका थोडी हटके आहे.

बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या "नच बलिये' डान्स रिऍलिटी शो आणि "नूर' चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आलीय. तिचे "तेवर', "अकिरा' आणि "फोर्स 2' फारसे चालले नाहीत. तरीही तिच्या आगामी "नूर' अन्‌ "इत्तेफाक'ची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहताहेत. "इत्तेफाक'मध्ये ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसेल, असं सुरुवातीला बोललं जात होतं; मात्र आता ती खलनायिकेचा रोल साकारणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोनाक्षी "इत्तेफाक' चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहे. ती म्हणते, "पहिल्यांदाच मी खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थसोबतही मी प्रथमच काम करतेय. माझी भूमिका थोडी हटके आहे. प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल.' सोनाक्षीचा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या "इत्तेफाक'चा आधुनिक रिमेक आहे, तीच असं सांगतेय सगळ्यांना. रिमेकमधील पटकथेमध्ये बराच बदल करण्यात आला आहे, असंही तिने सांगितलं. बघू या व्हिलन सोनाली तिच्या फॅन्सना आवडते का ते...  

Web Title: sonakshi sinha ittefaq as a villain