सोनाक्षी सिन्हा आता अनोख्या भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

"खानदानी शफाखाना' या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आगळीवेगळी भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट "सेक्‍स' विषयावर आधारित आहे.

"खानदानी शफाखाना' या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आगळीवेगळी भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट "सेक्‍स' विषयावर आधारित आहे. यामध्ये एका छोट्या शहरामधून आलेल्या पंजाबी मुलीची व्यक्तिरेखा सोनाक्षी साकारणार असून, तिचे नाव बेबी बेदी असे आहे. तिला काकांनी एक क्‍लिनिक चालविण्यास दिले आहे. देशामध्ये सेक्‍सबाबत कमी बोलले जाते. त्यातच चुकीच्या गोष्टींबाबत बेबी बेदी एक मोहीम उघडते. निर्मात्याने सेक्‍ससंबंधी समस्या मांडताना, त्याचे विश्‍लेषण करताना आणि त्या सादर करताना चित्रपटात अनेक विनोदही होत आहेत.

पुरुषप्रधान संस्कृतीत सेक्‍ससंबंधी समस्यांवर बेबी बेदी उपचार करते. त्या वेळी होणारे विनोद प्रेक्षकांना नक्कीच भावतील, असे आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून वरुण शर्मा आणि बादशाह हे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. 

याबाबत सोनाक्षी म्हणाली, ""सर्वसामान्य नागरिकांशी निगडित हा विषय असल्यामुळे चित्रपटामध्ये अभिनय करण्याचा निर्णय घेतला आहे. "जो है, शर्माओ मत, बात करो' ही बेबी बेदीची टॅगलाइन लोकांनी उचलून धरावी, यासाठी मी प्रोत्साहन देणार आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonakshi Sinha in New Role