सोनाक्षी सिन्हाला हवाय असा बॉयफ्रेंड; ती म्हणते…

सोनाक्षी सिन्हाला हवाय असा बॉयफ्रेंड; ती म्हणते…

मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागच्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. सोनाक्षीच्या सिने करिअरच्या कारकिर्दीत तिचं नाव काही मोजक्या अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं मात्र नंतर त्या सर्व अफवा असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता सोनाक्षी कोणालाही डेट करत नसून ती सध्या खऱ्या प्रेमाच्या शोधात नसल्याचं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं स्पष्ट केलं आहे.

नेहमीच आपल्या खासगी जीवनाविषयी बोलणं टाळणारी सोनाक्षी आजकाल तिच्या पर्सनल लाइफबाबत मोकळेपणानं बोलताना दिसत आहे. सोनाीने दिलेल्या एका मुलाखतीत तिला कसा बॉयफ्रेंड हवा याविषयी सांगितलं. सोनाक्षी म्हणाली, मी माझ्या आयुष्यात रिलेशनशिपची कमतरता अनुभवते आहे. माझ्या अनेक मित्रमैत्रीणींना त्यांचे पार्टनर भेटले आहेत आणि त्या सर्वांसाठी मी खूप खूश आहे.

मला एक गोष्ट समजली आहे की आयुष्यात आपण ज्या गोष्टीचा पाठलाग करतो ती गोष्ट आपल्या हातातून निसटून जाते. मी एक सामान्य मुलगी आहे जी रोमान्स आणि रिलेशनशिपची स्वप्न पाहते. मला रिलेशनशिप आवडते आणि मी एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्यभर नात्यात राहू शकते.

सोनाक्षी पुढे म्हणाली, सध्या मी प्रेमाच्या शोधात नाही आहे. प्रेमाला स्वतःहून माझ्याकडे यावं लागेल. यामुळे जर कोणाचं दबंग गर्लवर प्रेम असेल तर त्यांनी ते तिच्याकडे व्यक्त करण्यासाठी अजिबात उशीर करू नये असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. याआधी एका मुलाखतीत सोनाक्षीनं, माझ्या आई-बाबांना वाटतं की, मी एका सुशील मुलाशी लग्न करावं आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असं कोणीही नाही. माझ्या भूतकाळात मी एका स्टार बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट केलं होतं आणि याबद्दल कोणाला काहीच समजलं नाही.’ असं सांगितलं होतं.पण यावेळी सोनाक्षीनं या अभिनेत्याचं नाव घेणं मात्र टाळलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com