Sonalee Kulkarni: ''16 डिसेंबरला ती येत आहे''; सोनालीच्या पोस्टनं वेधलं लक्ष Sonlee Kulkarni | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonalee Kulkarni And Pushkar Jog Victoria Movie, release on 16th december.

Sonalee Kulkarni: ''16 डिसेंबरला ती येत आहे''; सोनालीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Sonalee Kulkarni: निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग स्कॉटलंडमध्ये त्यांच्या तिसऱ्या मराठी चित्रपटासाठी म्हणजेच थ्रीलर “व्हिक्टोरिया” साठी पुन्हा एकत्र आले आहेत. 'ती आणि ती' , 'वेल डन बेबी' चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पिक्चर्स, एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत .(Sonalee Kulkarni And Pushkar Jog Victoria Movie, release on 16th december.)

पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका असलेल्या 'व्हिक्टोरिया' या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग स्कॉटलंड मध्ये झालेले आहे . या चित्रपटातून हीरा सोहल ही अभिनेत्री पदार्पण करत आहे .जीत अशोक आणि मृणाल कुलकर्णीचा मुलगा विराजस कुलकर्णी हे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत .

सोनालीनं जेव्हापासून चित्रपटा संदर्भातील पोस्ट शेअर केली आहे,तेव्हापासून लोकांना या कलाकृती विषयी उत्सुकता लागून राहिलेली आहे. सोनालीनं सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं होतं,'ती येत आहे...' सविस्तर पोस्ट वर बातमीत जोडलेली आहे. ती आपल्याला पाहता येईल.

हेही वाचा: Salman Khan:'सलमानहून मोठी असले म्हणून काय झालं,मला त्याच्यासोबत...',नीना गुप्तांच्या वक्तव्यानं खळबळ

या चित्रपटाची कथा , पटकथा व संवाद ओमकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.

तसेच अभिनेता पुष्कर जोगचा सोनाली कुलकर्णीसह हा तिसरा चित्रपट आहे , या पूर्वी 'ती आणि ती' , 'तमाशा लाईव्ह' हे दोन चित्रपट त्यांनी एकत्र केले आहेत .

आनंद पंडित , रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत , वैशल शाह हे सह निर्माता आहेत .