जेव्हा अप्सरा विचारते,''सांगा मी कशी दिसते?''

कलरफुल साड्या नेसून नटल्या-सवरलेल्या सोनाली कुलकर्णीचा चाहत्यांना सवाल....
Sonalee Kulkarni
Sonalee KulkarniGoogle

साडी ही महिला वर्गाचं पहिलं प्रेम.आज मॉडर्न वेस्टर्न कपडे घालणाऱ्य़ा मुलीही आवर्जुन साड्या नेसतात. आणि मग आपसुक नटणं-मुरडणं आलंच. अर्थात प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य हे साडीत अधिक खुलून दिसतं हे जे म्हणतात ते काही चुकीचं नाही. बरं हे काही आम्ही फक्त सर्वसामान्य स्त्रीयां संदर्भातच नाही म्हणत आहोत तर यामध्ये आपल्या अभिनेत्रींचाही समावेश आहे बरं का. सिनेमात ट्रेडिशनल लूक कॅरी करताना अनेक अभिनेत्री या सिल्कच्या साड्यांना किंवा साडीतही हॉट लूक दाखवण्यासाठी शिफॉन किंवा डिझाइनर साड्यांना अधिक पसंती देताना दिसतात. साडीतल्या हॉट लूकचा विषय आला म्हणूनच इथं सांगावसं वाटतं की आठवून पहा अशी कितीतरी गाणी आहेत ज्यात साडी नेसून पावसात भिजलेली हिरोईन आपल्या हॉट दिसण्यानं भाव खाऊन गेलीय. आता उहाहरण द्यायचं झालं तर मोहरा सिनेमातील 'टीप टीप बरसा पानी' या गाण्यात पिवळ्या रंगाची साडी नेसून पावसात भिजत थिरकणारी रविना टंडन आजही नजरेसमोर पटकन येते.

आता हा साडीचा विषय छेडला त्यामागचं कारण आहे नटरंग फेम सोनाली कुलकर्णीनं(Sonalee Kulkarni) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ. ज्या व्हिडीओत सोनालीचं रुप अधिक खुलून आलेलं दिसतंय. तिनं रंगबिरंगी साड्या नेसत,छान दागदागिने घालून आपल्या चाहत्यांसाठी हा व्हिडीओ पोस्ट केलाय. गळ्यात चंद्रहार,माथ्यावर मांगटिक्का,नाकात मोत्यांची नथ,कमरेत कमरपट्टा अशा दागदागिन्यांनी मढलेली आणि विविध रंगातील साड्या परिधान करून नटणारी-मुरडणारी सोनाली या व्हिडीओत भाव खाऊन गेलीय हे मात्र खरंय. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी चांगल्या कमेंट्स करीत तिची तारीफ केलीय हे वेगळं सांगायला नकोय. सुबोध भावेची बायको निर्माती मंजीरी भावेनं तिच्या व्हिडीओवर म्हटलंय,'सगळेच रंग तुझ्यावर खुलून दिसतात,हे वेगळं सांगायला नको'. हा व्हिडीओ पोस्ट करून सोनालीनं लोकांना प्रश्नही विचारलाय की, ''यातली कोणत्या रंगाची साडी तुम्हाला अधिक आवडते?''

Sonalee Kulkarni
बॉलीवूडची पहिली 'वुमन सुपरहिरो' बनण्याच्या नादात जॅकलिन अशी फसली...

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती आपल्या कामासंदर्भातले अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. तिचे चाहते देखील तिच्या व्हिडीओच्या प्रतिक्षेत असतात. त्यामुळे तिचा हा साडी व्हिडीओ देखील चांगलाच पसंद केला जातोय. सोनालीचे नुकतेच प्रदर्शित झालेले 'झिम्मा' आणि 'पांडू' हे सिनेमे हिट झाले आहेत. बॉक्सऑफिसवर चांगलं कलेक्शनही करीत आहेत. तर संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा' या सिनेमात ती आता दिसणार आहे. अभिनेता सचित पाटील या सिनेमात तिच्यासोबत काम करीत आहे. सध्या सोनाली नवरा दुबईत राहत असल्यामुळे मुंबई-दुबई असा प्रवास करीत आहे पण त्याचा परिणाम ती आपल्या कामावर होऊ न देता तितकीच बिझी असल्याचंही दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com