काय झालं, कुठं झालं, कसं झालं सगळं सांगते.. सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonalee kulkarni got married second time with kunal benodekar in londan

काय झालं, कुठं झालं, कसं झालं सगळं सांगते.. सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली आणि आपल्या खास लुक मध्ये कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni)सध्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. सोनालीने करोना काळात कुणाल बेनोडेकर (kunal benodekar) सोबत अत्यंत साधे पणाने विवाह उरकला. पण आता ती पुन्हा लग्न करणार असल्याची चर्चा आहे. हे लग्न कधी होणार, कुठे होणार, कसे होणार याबाबत अनेक प्रश्न विचारले जात होते. अखेर यावर सोनालीने स्वतःच एक पोस्ट करून उत्तर दिले आहे.

हेही वाचा: RRR ON OTT: आरआरआर ओटीटीवर 'त्या'च दिवशी का येतोय, काय आहे कारण?

सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनाली आणि कुणाल असे लिहिले आहे. सोबत एक हटके कॅप्शनही दिले आहे. “pandemic मुळे दोन वेळा postpone करून तिसऱ्यांदा cancel करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता register marriage करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई वडील, कुटुंबियांना travel करता नाही आलं. Zoom call वरून साक्षीदार झाले.' असे सोनालीने लिहिले आहे

पूढे ती म्हणते, 'पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि celebrate करू अश्या आशेवर, गेल्या वर्षी ७.०५.२०२१ ला आम्ही court marriage केलं. यंदा, आमच्या पहिल्या wedding anniversary ला आम्ही सह कुटुंब – सह परिवार – ठरल्या प्रमाणे – संपूर्ण विधीपूर्वक – मराठमोळ्या पद्धतीने – अगदी स्वप्नवत – लग्न केलं. ता काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं – सगळं share करू “लवकरच” ! तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: Sonalee Kulkarni Got Married Second Time With Kunal Benodekar In Londan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top