RRR ON OTT: 'आरआरआर' ओटीटीवर 'त्या'च दिवशी का येतोय, काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR release on OTT at 20 may  on the occasion of jr NTR birthday

RRR ON OTT: आरआरआर ओटीटीवर 'त्या'च दिवशी का येतोय, काय आहे कारण?

बहुचर्चित आणि बहूप्रतिक्षीत ‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट ओटीटी वर कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कोट्यवधींची कमाई करणारा हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आजवर बरेच रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट आता ओटीटी वर येत असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (RRR ON OTT)

हेही वाचा: 'राज ठाकरे म्हणजे एक अव्वल कलाकार' केदार शिंदे यांची खास पोस्ट

एसएस राजमौली (SS Rajamouli) यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात राम चरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर Jr. NTR मुख्य भूमिकेत आहेत. तर, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट आता घरबसल्या पहाता येणार आहे. कारण २० मे रोजी हा चित्रपट झी ५ (zee 5) या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट नेमका त्याच दिवशी ओटीटी वर रिलीज करण्यामागे कारणही खास आहे.

हेही वाचा: किचन कल्लाकार : या कलाकारांच्या मुलांनी उडवली धमाल, पदार्थ करताना..

अभिनेता ज्युनियर एनटीआर याचा २० मे रोजी वाढदिवस आहे. त्यामुळेच चाहत्यांना ही खास भेट ज्युनियर एनटीआर ने दिली आहे. या बातमीमुळे चाहते खुश झाले असून बॉक्स ऑफिस प्रमाणेओटीटी वरही चाहते चित्रपट पाहायला गर्दी करतील असे दिसते आहे. काही चाहत्यांनी तर चित्रपट ओटीटी वर रिलीज होत असल्याचेही जोरदार प्रमोशन केले आहे.

काही दिवसांपूर्वीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. पण त्यामागे हे खास निमित्त आहे हे नुकतेच कळले आहे. पण हा चित्रपट ओटीटी वर केवळ दाक्षिणात्य प्रदशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीत कधी रिलीज होणार याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. पण याच दिवशी नेटफ्लिक्स Netflix वर आरआरआर हिंदी मध्ये रिलीज होईल असा अंदाज काहींनी वर्तवला आहे.

Web Title: Rrr Release On Ott At 20 May On The Occasion Of Jr Ntr Birthday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top