साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे; सोनालीने पोस्ट केले खास फोटो

साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे; सोनालीने पोस्ट केले खास फोटो

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या वर्षी २ फेब्रुवारी रोजी दुबईत तिचा साखरपुडा पार पडला. कोणताही गाजावाजा न करता तिने साखरपुडा केला आणि नंतर मे महिन्यात वाढदिवसाचं निमित्त साधत सोशल मीडियावर लग्नाची घोषणा केली. कुणाल बेनोडेकर असं तिच्या होणाऱ्या पतीचं नाव असून सध्या सोनालीने साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे, असं मजेशीर कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. यातील पहिल्या दोन फोटोंमध्ये सोनाली मिठाईच्या ताटाकडे पाहताना दिसतेय तर तिसरा फोटो तिला मिठाई भरवताना टिपला आहे. या फोटोंमधील सोनालीच्या चेहऱ्याचे हावभाव पाहून नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींनाही हसू आवरलं नाही. 'मी अशी नाहीये, फक्त हे क्षण असे टिपले गेलेत', अशी ओळ सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिली आहे. हे वाचून अभिनेता अमेय वाघलाही कमेंट करण्याचा मोह आवरला नाही. 'खोटं नको बोलूस, तू अशीच आहेस', असं म्हणत त्याने सोनालीची गंमत केली. 

२ फेब्रुवारी २०२० रोजी दुबई मरिना या ठिकाणी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत सोनालीचा साखरपुडा पार पडला. सोनालीने अद्याप तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली नाही. तिचा होणारा पती कुणाल बेनोडेकर हा लंडन इथला असून कामानिमित्त तो दुबईत वास्तव्यास असतो. लग्नानंतर सोनाली दुबईत स्थायिक होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप सोनालीने काही अधिकृत माहिती दिली नाही.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

sonalee kulkarni posted her unseen engagement photos on the engagement anniversary

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com