sonali kulkarni and onkar bhojane movie short and sweet movie poster launch
sonali kulkarni and onkar bhojane movie short and sweet movie poster launchSAKAL

Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णी - ओमकार भोजने एकत्र, दिसणार अनोखी 'शॉर्ट अॅंड स्वीट' लव्हस्टोरी

सोनाली कुलकर्णी - ओंकार भोजने आगामी लव्हस्टोरीमध्ये दिसणार आहेत
Published on

हास्यजत्रा फेम ओंकार भोजने सर्वांचा आवडता अभिनेता. ओंकारने हास्यजत्रा सोजल्यावर तो चला हवा येऊ द्या मध्ये झळकला. याशिवाय त्याला अनेक सिनेमांची ऑफर मिळाली. बॉईज, सरला एक कोटी अशा सिनेमांमध्ये ओंकार झळकला.

आता ओंकारचा आणखी एक नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे शॉर्ट अँड स्वीट. या सिनेमाची नुकतीच घोषणा झालीय.

(sonali kulkarni and onkar bhojane movie short and sweet movie poster launch)

sonali kulkarni and onkar bhojane movie short and sweet movie poster launch
Govinda: १००० कोटींच्या क्रिप्टो - पोंझी घोटाळ्यात गोविंदाची होणार चौकशी, वाचा सविस्तर

काय आहे शॉर्ट अँड स्वीट सिनेमाची कथा

गणेश कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचे पोस्टर आज प्रसिद्ध करण्यात आले. या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची कथा संवेदनशीलपणे रेखाटण्यात आली असून या पहिल्या पोस्टरमध्ये ही बाब अत्यंत ठळकपणे अधोरेखित होते. या पोस्टरच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

शॉर्ट अँड स्वीट सिनेमाचे कलाकार

सोनाली कुलकर्णी, श्रीधर वत्सर, हर्षद अटकरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये हे कलाकार दिसत आहेत. त्यातील नायक श्रीधर वत्सर एका टेबलावर उभा राहून सोनाली कुलकर्णीच्या गालाजवळ आपले ओठ नेतो असे या पोस्टरमध्ये दिसते. या दृश्यातून चित्रपट रंजक आणि वेगळ्या धाटणीचा आहे, हे अधोरेखित होते. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा चित्रपट रसिक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये सुरु झाली आहे.

sonali kulkarni and onkar bhojane movie short and sweet movie poster launch
Jawan: "बेटे को हाथ लगाने से पहले..", डायलॉग स्क्रिप्टमध्येच नव्हताच, मग कसा आला? लेखकाने केला खुलासा

शॉर्ट अँड स्वीट सिनेमाची रिलीज डेट

याआधी निर्मिती कंपनीने अनेक चित्रपटांची निर्मिती केली असून त्यात मुक्ता बर्वेचा बंदिशाळा (जुन २०१९) या मराठी चित्रपटाचा समावेश असून त्याचे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे.

याशिवाय ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर (फेब्रुवारी २०२२) यांच्या दिग्दर्शनाखाली झाली आहे. त्याचबरोबर ‘कलरफुल’ या चित्रपटाची निर्मिती प्रकाश कुंटे यांच्या दिग्दर्शनाखाली झाली असून हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होत आहे.

ओंकार - सोनाली यांचा ‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमा ३ नोव्हेंबर २०२३ ला रिलीज होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com